प्रवासी वाहनात गुरांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:29+5:302021-04-05T04:08:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क केळवद : पाेलिसांनी नागपूर-पांढुर्णा मार्गावरील येलकापार-खुर्सापार दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये गुरांची वाहतूक करणारे प्रवासी वाहन पकडले. यात ...

प्रवासी वाहनात गुरांची वाहतूक
लाेकमत न्यूज नेटवर्क
केळवद : पाेलिसांनी नागपूर-पांढुर्णा मार्गावरील येलकापार-खुर्सापार दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये गुरांची वाहतूक करणारे प्रवासी वाहन पकडले. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, वाहनातील सहा जनावरांची सुटका करीत एकूण ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. ३) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
करण जितेंद्र भावे (२५, रा. इंदोरी, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश) व हर्षत नंदकिशोर मेश्राम (२१, रा. भीमनगर, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. केळवद (ता. सावनेर) पाेलिसांचे पथक शनिवारी रात्री गस्तीवर असतानपा त्यांना मध्य प्रदेशातून नागपूरच्या दिशेने जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या मार्गावरील येलकापार-खुर्सापार दरम्यान नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.
संशय आल्याने पाेलिसांनी नागपूरच्या दिशेने जात असलेले एमएच-३१/एएच-९४०२ क्रमांकाचे प्रवासी वाहन थांबवून झडती घेतली. त्यांना त्या वाहनात सहा जनावरे काेंबली असल्याचे आढळून आले. ती गुरांची अवैध वाहतूक असून, सर्व गुरे कामठी शहरातील कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी दाेघांना अटक केली आणि वाहनातील सहा जनावरांची सुटका करून त्यांना नजीकच्या गाेरक्षणामध्ये पाठविण्याची व्यवस्था केली.
या कारवाईमध्ये पाच लाख रुपये किमतीचे वाहन आणि ६० हजार रुपयांचे सहा जनावरे असा एकूण ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. ही कारपाई पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड, सचिन येलकर, देवा देवकते, रवींद्र चटप, राजू रेवतकर, गुणवंता डाखोळे यांच्या पथकाने केली.