शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 03:54 IST2018-12-08T03:53:48+5:302018-12-08T03:54:24+5:30

महिला पोलीस शिपायाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेले एसीबीचे एसपी प्रद्युम्न पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली.

transfer Superintendent of Police, demanding sex | शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक उचलबांगडी

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधीक्षक उचलबांगडी

नागपूर : महिला पोलीस शिपायाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेले एसीबीचे एसपी प्रद्युम्न पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांना तडकाफडकी मुंबई मुख्यालयात हजर होण्याचे निर्देश एका आदेशातून जारी करण्यात आले. तर, त्यांच्या रिक्त पदावर अमरावती एसीबीचे एसपी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली.
पाटील शरीरसुखाची मागणी करून अक्षरश: छळ करतात, अशी तक्रार पीडित महिला कर्मचाºयाने थेट पोलीस महासंचालक (एसीबी) संजय बर्वे यांच्याकडे पाठवली होती. त्याची गंभीर दखल घेत बर्वे यांनी विशाखा समितीकडून चौकशी करून घेतली. त्यासाठी १५ दिवसांपूर्वी मुंबईहून एसीबीची चौकशी समिती नागपुरात आली होती. चौकशीत भक्कम पुराव्याची साखळी मिळाल्याने पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.

Web Title: transfer Superintendent of Police, demanding sex