शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांनी अनुभवली पोलीस आयुक्तांमधली संवेदनशीलता

By योगेश पांडे | Updated: April 21, 2024 22:59 IST

मतदानाच्या दिवशी जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त होता. त्याच दिवशी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात मुक्कामाला होते. त्यामुळे पोलीस यंत्रणा मतदानानंतर त्या बंदोबस्तात लागली. प्रीती मिंधे व पूजा सहारे या दोघींची ड्युटी सिव्हिल लाईन्स परिसरात लागली होती...

नागपूर : निवडणूकीसाठी बंदोबस्तावर असलेल्या दोन प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांना पोलीस आयुक्तांमधील संवेदनशीलता अनुभविण्यास आली. कर्तव्यावर असताना काहीशा भेदरलेल्या अवस्थेतील या महिला पोलिसांशी पोलीस आयुक्तांनी आत्मियतेने संवाद साधून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविला. या कृतीमुळे पोलीस वर्तुळात सकारात्मक संदेश गेला आहे.मतदानाच्या दिवशी जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त होता. त्याच दिवशी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात मुक्कामाला होते. त्यामुळे पोलीस यंत्रणा मतदानानंतर त्या बंदोबस्तात लागली. प्रीती मिंधे व पूजा सहारे या दोघींची ड्युटी सिव्हिल लाईन्स परिसरात लागली होती. नवीन अनुभव असल्याने त्या काहीशा भेदरलेल्या होत्या. परंतु तरीदेखील त्या शिस्तीत उभ्या होत्या. त्या मार्गाने पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल हे जात असताना त्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले व त्यांनी गाडी थांबविण्याची सूचना केली. पोलीस आयुक्तांना पाहताच दोघीही काहीशा गडबडल्या, मात्र त्यांनी लगेच सॅल्युट केला.पोलीस आयुक्तांनी त्यांची विचारपूस केली व त्या दोघीही प्रतिकूल परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचल्याचे त्यांना कळाले. एकीचे वडील शेतकरी तर दुसरीचे रिक्षा चालक आहेत. नवीन असूनदेखील न थकता प्रामाणिकपणे त्या कर्तव्यावर होत्या. पोलीस आयुक्तांनी त्यांना निवासस्थानाच्या परिसरात बोलविले व त्यांच्याशी संवाद साधला. पोलीस आयुक्त आमच्याशी बोलत होते तेव्हा जणू आमचे वडिलच बोलत आहेत असे वाटत होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस