शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

नागपूरहून निघालेली भाजपा कार्यकर्त्यांची ट्रेन गुजरातमार्गे मुंबईत; समारोपाला हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 2:40 PM

भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईत आयोजित महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी दीड हजारावर कार्यकर्त्यांना घेऊन गुरुवारी नागपुरातून विशेष रेल्वे निघाली. मात्र, ही रेल्वे थेट मुंबईला न पोहोचता गुजरातमार्गे वळविण्यात आली.

ठळक मुद्देसूरत, वलसाडमार्गे दुपारी २ वाजता कार्यक्रमस्थळी दाखलबेस्टच्या बसेसने पोहचविले कार्यक्रम स्थळीहेतू पुरस्सर केल्याचा भाजपाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईत आयोजित महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी दीड हजारावर कार्यकर्त्यांना घेऊन गुरुवारी नागपुरातून विशेष रेल्वे निघाली. मात्र, ही रेल्वे थेट मुंबईला न पोहोचता गुजरातमार्गे वळविण्यात आली. या विलंबामुळे ही रेल्वे दुपारी २ वाजताच्या सुमा

रास बांद्रा येथे पोहोचली. तेथून नेते व कार्यकर्त्यांना बेस्टच्या बसद्वारे बांद्रा कुर्ला येथील कार्यक्रमस्थळी पोहचविण्यात आले. मात्र, तोवर मेळावा समारोपाला आला होता. यामुळे कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.नागपूरहून गुरुवारी दुपारी ३.२४ वाजता ही विशेष रेल्वे सुटली. १९ डब्याची ही रेल्वे कार्यकर्त्यांनी फुल्ल होती. सुमारे १५०० ते १८०० पदाधिकारी व कार्यकर्ते या गाडीत होते. भाजपाचे आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी महापौर प्रवीण दटके, अर्चना डेहनकर, डॉ. किर्तीदा अजमेरा, संदीप जाधव, श्रीकांत देशपांडे यांच्यासह बहुतांश नगरसेवक, नगरसेविका व त्यांचे पतीही या गाडीत होते. नागपूरहून मुंबईला पोहचण्यासाठी साधारणत: १४ ते १५ तास लागतात. त्यामुळे ही गाडी सकाळी ७ पर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. पदाधिकारी व कार्यकर्ते तशा चर्चांमध्ये रंगले होते. मात्र, ही गाडी गुजरातमार्गे वळविण्यात आल्याचे पहाटे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. मनमाडवरून नंदूरबार मार्गे ही गाडी वळविण्यात आली असून ती आता सूरत, वलसाड मार्गे मुंबईला पोहचेल, अशी माहिती कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा भडका उडाला. सकाळी ९.५० वाजता गाडी वलसाड येथे पोहचली. येथे भाजप नेत्यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली. नियमित गाड्यांसाठी रेल्वे रूट व्यस्त असल्यामुळे गुजरातमार्गे ही विशेष गाडी वळविण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.नागपुरातून सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांसाठी गुरुवारी विशेष रेल्वेगाडी ‘बुक’ करण्यात आली होती. रेल्वेतर्फे तिची नागपूरहून सुटण्याची वेळ सकाळी ७.५० ची निश्चित करण्यात आली होती. मात्र भाजपतर्फे कार्यकर्त्यांना सकाळी १० ची वेळ सांगण्यात आली. फक्त कार्यकर्ते घेऊन विशेष रेल्वेगाडी ८.१५ वाजता नागपूरहून रवाना झाली. भाजप पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क करुन हा गोंधळ कळविला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने जी गाडी दुपारी १२ वाजता वर्ध्याहून निघणार होती ती नागपुरात बोलविली. ही दुपारी ३.२४ वाजता गाडी मुंबईकडे रवाना झाली होती. एवढे सर्व होऊनही गाडी गुजरातला वळविल्याने कार्यकर्त्यांना मुंबईत पोहचायला ८ ते ९ तासांचा विलंब झाला. यामुळे मेळाव्याच्या शुभारंभाला पोहचण्याच्या आशेने निघालेले कार्यकर्ते समारोपालाच पोहचले.रेल्वेने हेतूपूरस्सर रेल्वे वळवली : भाजपाचा आरोपगुरुवारी दुपारी मुंबईसाठी निघालेली विशेष रेल्वेगाडी कारण नसताना गुजरातच्या ट्रॅकशी जोडण्यात आली. ही गाडी सकाळी ९.५० वाजता वलसाड येथे पोहोचली. रेल्वेचे अधिकारी लालफितशाहीच्या मानसिकतेतून अद्याप बाहेर आलेली नाही. भाजपाचे कार्यकर्ते वेळेवर मुंबईत पोहचू नये या उद्देशाने रेल्वेने हेतूपूरस्सर ही रेल्वे गुजरातला वळविल्याचा आरोप भाजापाचे प्रसिद्ध प्रमुख चंदन गोस्वामी यांनी केला.

टॅग्स :BJP rally in Mumbaiभाजपाचा महामेळावा 2018