नागपुरात टेरेसवरून पडून अडीच वर्षाच्या बालिकेचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 19:59 IST2020-05-19T19:58:01+5:302020-05-19T19:59:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इमारतीवर खेळत असताना चक्कर येऊन खाली पडल्यामुळे चिमुकलीचा करुण अंत झाला. मारिया फिरदोस मोहम्मद ...

नागपुरात टेरेसवरून पडून अडीच वर्षाच्या बालिकेचा करुण अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इमारतीवर खेळत असताना चक्कर येऊन खाली पडल्यामुळे चिमुकलीचा करुण अंत झाला. मारिया फिरदोस मोहम्मद आबीद असे मृत बालिकेचे नाव असून ती केवळ अडीच वर्षांची होती.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जलालपुरा भागात त्यांचे घर आहे.
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास आबीद घराच्या टेरेसवर असलेल्या टाकीतून पाणी भरत होते. तर, चिमुकली मारिया टेरेसवर खेळत होती. खेळता खेळता तिचा पाय अडखळून ती स्लॅबवर पडली. ती गंभीर जखमी झाल्याने घरच्यांनी तिला बाजूला असलेल्या ओळखीच्या डॉक्टरांकडे नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मोहम्मद आबीद अब्दुल वाहिद कुरेशी यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.