नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत मजुराचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:05 AM2020-11-24T00:05:49+5:302020-11-24T00:08:20+5:30

Tragic end of a laborer in a collision with a speedy vehicle भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे एका मजुराचा करुण अंत झाला. अमरावती मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात घडला.

Tragic end of a laborer in a collision with a speedy vehicle in Nagpur | नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत मजुराचा करुण अंत

नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत मजुराचा करुण अंत

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे एका मजुराचा करुण अंत झाला. अमरावती मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात घडला. राधेश्याम रामायण बियार (वय ३०) असे मृत मजुराचे नाव असून तो छत्तीसगडमधील कोरबा येथील रहिवासी होता.

राधेश्याम आणि त्याचे नातेवाईक काम (मजुरी) करण्यासाठी पुणे येथे निघाले होते. अमरावती मार्गावरील एका ढाब्यासमोर त्यांचे वाहन थांबले. राधेश्याम रस्ता ओलांडत असताना वेगात आलेल्या एमएच ०३/ एएन ६९९ च्या चालकाने राधेश्यामला जोरदार धडक मारली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ईश्वरी राधेश्याम बियार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

दुचाकी खांबावर धडकली, चालकाचा मृत्यू

 दुचाकी खांबावर धडकल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २२ नोव्हेंबरच्या पहाटे ४ वाजता हा अपघात घडला. प्रशांत ऊर्फ अजय श्याम शाहू (वय ३०) असे मृताचे नाव असून तो तेजबहादूर नगरात राहत होता.

प्रशांत आणि निशांत मनोहर भोयर हे दोन मित्र शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास यशोधरा नगरातून दुचाकीने वेगात जात होते. अनियंत्रित दुचाकी विजेच्या खांबाला धडकल्यामुळे खाली पडून दोघेही जबर जखमी झाले. डॉक्टरकडे नेले असता प्रशांत शाहूला डॉक्टरांनी मृत घोषित केले. श्याम रामसुमेर शाहू यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Tragic end of a laborer in a collision with a speedy vehicle in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.