शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

शोकांतिका ! नागपुरात २३४ रुग्णांमागे एक खाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 22:48 IST

शहरात एकीकडे डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लोकसंख्या ३० लाखांवर गेली असलीतरी वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.

ठळक मुद्दे३० लाख लोकसंख्येच्या तुलनेत १२८१५ खाटा आरोग्य सेवा तोकडीजागतिक आरोग्य दिन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात एकीकडे डेंग्यू, स्वाईन फ्लू सारखे संसर्गजन्य आजार झपाट्याने वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे लोकसंख्या ३० लाखांवर गेली असलीतरी वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. साध्या शासकीय व खासगी रुग्णालयांतील एकूण खाटांचा विचार केला तर शहरात केवळ १२८१५ खाटा उपलब्ध आहेत, यावरून २३४ नागरिकांमागे एक खाट असे प्रमाण आहे. शहरात दुर्दैवाने एखादे नैसर्गिक संकट आले आणि त्यामध्ये १४ हजारावरील नागरिक पीडित झाले तर काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. नागपूर हे ‘मेट्रो’ सिटी होत आहे. यामुळे येथे धन्वंतरीचे पाईक रुग्णसेवेसाठी तत्पर असतील, पण सेवा देणारे कुठे हाच प्रश्न भविष्यात समोर येणार आहे.२०११ साली २० लाख लोकसंख्या असलेले नागपूर शहर ३० लाख लोकसंख्येच्या पुढे सरकले आहे. शहरात मनपाचे ३७ दवाखाने, १२ हेल्थ पोस्ट व १० माता-बाल संगोपन केंदे्र आहेत. यातील महापालिकेच्या पाचपावली दवाखान्यात १० खाटा, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ८० खाटा तर इमामवाडा येथील आयसोलेशन दवाखान्यात ४० खाटा अशा एकूण १३० रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था आहे. शहरात तीन शासकीय रुग्णालये महत्त्वाची आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेडिकल) खाटांची संख्या १६०० आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) खाटांची संख्या ६९० आहे, तर डागा रुग्णालयात ३६५ खाटांची सोय आहे. खासगी रुग्णालयांची संख्या ६३३ असून खाटांची संख्या ९८०० आहे, एकूण खाटांची संख्या १२८१५ आहे. परंतु लोकसंख्येचा विचार केल्यास ही संख्या अपुरी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार गेल्या आठ वर्षांत स्वाईन फ्लू, डेंग्यूचे आजार बळावले आहेत. दरवर्षी यात वाढ होताना दिसून येत आहे. इतरही संसर्गजन्य आजार वेळोवेळी डोके वर काढतात, अशावेळी अचानक मोठी आपत्ती ओढवल्यास नागपुरात बिकट स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.दोन हजार रुग्णक्षमतेच्या रुग्णालयांची गरजवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाच्या मते, १९८५ च्या तुलनेत सध्या शहराचा विस्तार चारही दिशेने झाला आहे. ३० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात सुमारे चार लाख नागरिक शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानकातून दररोज ये-जा करतात. शहरात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघात साधारण चार ते पाच लाख लोकसंख्या आहे. यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन हजार रुग्णक्षमता असलेल्या रुग्णालयाची गरज आहे. शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांवर नजर टाकल्यास एकाही रुग्णालयात अत्याधुनिक सोयी नाहीत. येथील रुग्णालयाची भिस्त जुन्याच सोर्इंवर आहे. यातच मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे वाढलेले रुग्ण, त्या तुलनेत सोयींचा तुटवडा व कमी मनुष्यबळामुळे गरीब रुग्ण गैरसोयींना तोंड देत असल्याचे चित्र आहे.आरोग्य संस्था         रुग्णालयाची संख्या                  खाटांची संख्यामनपा                         ३                                               १३०मेडिकल                     १                                                १,६००मेयो                           १                                               ६९०डागा                          १                                              ३६५सुपर स्पे. हॉस्पिटल    १                                            २३०खासगी रुग्णालये     ६३३                                        ९८००४८ हेल्थ पोस्टची आवश्यक्ता५० हजार लोकसंख्येमागे एक हेल्थ पोस्ट असावे, असे शासनाचे प्रमाण आहे. महापालिकेचे १२ हेल्थ पोस्ट आहेत. आणखी ४८ हेल्थ पोस्टची शहराला गरज आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज आहे, मात्र शासनाचे अद्यापही याकडे लक्ष नाही.शासकीय रुग्णालयांचा वापर पूर्ण क्षमतेने होण्याची गरजनागपुरात कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र आहे, राज्य कामगार रुग्णालय आहे, मनपाचे हॉस्पिटल आहे या सर्वांचा वापर आजही पूर्ण क्षमतेने होत नाही. शासनाने याकडे आताच लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे रोजच्या रुग्णांना मदत तर होईलच मोठी आपत्ती आल्यास याचीही मदत मिळेल.डॉ. वाय. एस. देशपांडेअध्यक्ष, आयएमए महाराष्ट्र 

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर