शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक सिग्नल बंद

By admin | Updated: September 19, 2014 00:53 IST

एकिकडे नागपूरकरांना मेट्रो रेल्वेची स्वप्ने दाखविली जात असताना सध्या अस्तिवात असलेल्या शहरातील वाहतूक सिग्नल यंत्रणेचे मात्र पुरते वाटोळे झाले आहे. शहरातील वर्दळीच्या मार्गावरील काही

नागपूर : एकिकडे नागपूरकरांना मेट्रो रेल्वेची स्वप्ने दाखविली जात असताना सध्या अस्तिवात असलेल्या शहरातील वाहतूक सिग्नल यंत्रणेचे मात्र पुरते वाटोळे झाले आहे. शहरातील वर्दळीच्या मार्गावरील काही वाहतूक सिग्नल बंद असल्याने तसेच काही सिग्नलचे टायमर बंद असल्याने त्याचा वाहनचालकांना फटका बसतो आहे.सिव्हील लाईन्समध्ये अनेक सरकारी कार्यालये आहेत. कार्यालय सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी या भागातील रस्त्यावर वर्दळ असते. नेमके त्याच वेळी जीपीओ चौकातील सिग्नल बंद असतो. या मार्गावरील वाहनांची गर्दी लक्षात घेतली तर अपघाताचा धोका नाकारता येत नाही. विशेष म्हणजे पोलीस आणि महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने या मार्गावरून जात असतात. तरीही त्याची दखल घेतली जात नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अमरावती मार्गावरील बोले पेट्रोलपंपाजवळील सिग्नल कधी सुरू तर कधी बंद असतो. त्यापुढे गेल्यावर धरमपेठ शाळेजवलील सिग्नलचीही हीच स्थिती आहे. दक्षिणपश्चिम नागपूरमधील रिंगरोडवरील पडोळेनगर चौकातील सिग्नलचे काही दिवे बंद आहेत. त्यामुळे गोपालनगरकडून येणाऱ्या नागरिकांना सिग्नल सुरू केव्हा होतो आणि बंद केव्हा होतो हे कळतच नाही. स्वत:च अंदाज बांधून वाहने काढावी लागते.हा रस्ता दिवसरात्र वाहता असतो आणि सूसाट वेगाने वाहने धावत असतात. वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी चौकातून पुढे साईबाबा मंदिराकडे जाताना लागणाऱ्या सिग्नलची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. कारागृहाजवळील सिग्नल सुरू कमी आणि बंद अधिक काळ असतो. अजनी चौकातील सिग्नलच्या दिव्यांवर झाडांच्या फांद्या आल्या आहेत. देवनगर चौक, साईबाबा मंदिर चौकातील सिग्नलचे टायमर बंद आहे. कमी अधिक प्रमाणात शहरातील इतरही भागात यापेक्षा वेगळी स्थिती नाही.बजाजनगरपासून शंकरनगरपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे सध्या या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरु आहे. सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर होणाऱ्या कोंडीचा शाळेचे विद्यार्थी, सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतो. मात्र त्याची दखल कुठल्याच पातळीवर घेतली जात नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जातो आहे. (प्रतिनिधी)