शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
2
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
3
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
4
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
6
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
7
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
8
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
9
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
10
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
11
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
12
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
13
संचारसाथी ॲप : पाणी मुरते आहे, ते नेमके कुठे?
14
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
15
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
16
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
17
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
18
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
19
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
20
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात व्यापारी पुत्राचे अपहरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 10:22 IST

तहसीलमधील एका बड्या सुपारी व्यापाऱ्याचा तरुण मुलगा दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाला. त्याचे अपहरण करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.

ठळक मुद्देइतवारी-गांधीबागमध्ये खळबळपोलिसांकडून कसून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तहसीलमधील एका बड्या सुपारी व्यापाऱ्याचा तरुण मुलगा दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाला. त्याचे अपहरण करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. या संशयास्पद अपहरण प्रकरणाचा क्रिकेट सट्ट्यातील लाखोंच्या आर्थिक व्यवहारासोबत संबंध असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, या प्रकारामुळे व्यापारी वर्तुळासोबतच पोलीस दलातही खळबळ निर्माण झाली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, सदर तरुण इतवारी-गांधीबाग परिसरातील बड्या सुपारी व्यापारी कुुटुंबीयाचा सदस्य आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता तो घरी होता. त्याला त्यावेळी अनेकांचे फोन आले. त्यानंतर तो घाबरलेल्या अवस्थेत घरून पायीच बाहेर पडला. रात्र झाली तरी तो परत आला नाही. त्याचा मोबाईल आणि वाहन घरीच असल्याने त्याचा शोध कसा घ्यावा, असा प्रश्न कुटुंबीयांसमोर होता. कुटुंबीयांनी मुलाच्या मित्रांकडे चौकशी केली. काहीच पत्ता-ठिकाणा लागला नाही. त्यामुळे रात्री उशिरा तहसील ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी मिसिंगची नोंद घेऊन आपल्या वरिष्ठांना ही माहिती दिली.प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता मध्यरात्रीपासूनच पोलीस तपासकामी लागले. सदर कुुटुंबीयांच्या घराच्या समोरचे आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले.त्यात तो एकटाच जात असल्याचे दिसून आले. दोन दिवस होऊनही तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांसोबतच पोलिसही हादरले आहेत. जेवढे जास्त दिवस तेवढा अशा प्रकरणात धोका वाढतो, हे लक्षात आले.अनेक संशयितांची चौकशीपोलिसांनी त्याच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरून काही संशयितांकडे विचारपूस चालविली आहे. मात्र, रविवारी रात्रीपर्यंत त्याच्या संबंधाने कसलीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. या कथित अपहरण प्रकरणाचा क्रिकेट सट्ट्यासोबत संबंध असल्याचे सांगितले जाते. चर्चेनुसार, सदर तरुणाने आयपीएलमध्ये लाखोंची लगवाडी केली. प्रारंभी तो मोठी रक्कम जिंकला. नंतर मात्र हरतच गेल्याने त्याच्यावर लाखोंच्या थकीत रकमेचे वसुलीसाठी दडपण आले. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाचा बोभाटा होऊ नये म्हणून संबंधित कुटुंबीयांनी तसेच पोलिसांनीही कमालीची गोपनीयता बाळगली आहे. दरम्यान, कुटुंबीयांकडून पाहिजे तशी माहिती दिली जात नसल्याने पोलिसांना बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात अडचण येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने लोकमतला सांगितले.

टॅग्स :Kidnappingअपहरण