Traders must adhere to FDA rules:jt Commissioner Chandrakant Pawar | व्यापाऱ्यांनी एफडीए नियमांचे पालन करावे : सहआयुक्त चंद्रकांत पवार
व्यापाऱ्यांनी एफडीए नियमांचे पालन करावे : सहआयुक्त चंद्रकांत पवार

ठळक मुद्दे एनव्हीसीसीमध्ये चर्चासत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्क  
नागपूर : स्पर्धेत व्यापाऱ्यांनी ग्राहकांना गुणवत्तेचे उत्पादन द्यावे. व्यापारी गुणवत्तेच्या उत्पादनासह एफडीएच्या नियमांचे पालन करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. व्यापाऱ्यांनी डिजिटल पद्धतीने ग्राहकांना उत्तम सुविधा आणि सेवा देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांनी येथे केले.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यकारिणी सभेत चर्चेदरम्यान मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे (मुंबई) सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद महाजन, ललित सोयाम, प्रफुल्ल टोकले, किरण गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केले. परिचय अन्न सुरक्षा व औषधी उपसमितीचे संयोजक अ‍ॅड. निखिल अग्रवाल आणि उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा यांनी करून दिला.
शशिकांत केकरे म्हणाले, व्यापाऱ्यांनी खाद्यान्नाशी संबंधित नियमांचे पालन करून व्यवसाय करावा. यामध्ये एफडीएची भूमिका नेहमीच मदतीची राहील. अश्विन मेहाडिया म्हणाले, चेंबरच्या व्यापाऱ्यांनी नेहमीच जनहितार्थ काम केले आहे. चुकीचे काम न करता नेहमीच सरकारी नियमांचे पालन करून व्यवसाय केला आहे. व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले.
संचालन आणि आभार सचिव रामअवतार तोतला यांनी केले. याप्रसंगी माजी अध्यक्ष गोविंदलाल सारडा, प्रफुल्ल दोशी, बी.सी. भरतीया, हेमंत खुंगर, दीपेन अग्रवाल, प्रकाश मेहाडिया, उपाध्यक्ष फारुकभाई अकबानी, संजय के. अग्रवाल, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव उमेश पटेल, स्वप्निल अहिरकर, शब्बार शाकीर, जनसंपर्क अधिकारी राजू माखिजा यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Web Title: Traders must adhere to FDA rules:jt Commissioner Chandrakant Pawar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.