शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

तोतलाडोह ‘ओव्हरफ्लो’च्या दिशेने : ८७.३६ टक्के भरले धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:30 IST

महिनाभरापूर्वी ज्या तोतलाडोह धरणातील पाणीसाठा डेडस्टॉकच्याही खाली गेला होता तो आज ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील पाणीसाठा ८७.३६ टक्के इतका झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे२४ तासात १३ टक्के पाणी वाढलेचौराई धरणातील सहा गेटमधून सोडले जात आहे १४०० क्युसेक पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिनाभरापूर्वी ज्या तोतलाडोह धरणातीलपाणीसाठा डेडस्टॉकच्याही खाली गेला होता तो आज ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील पाणीसाठा ८७.३६ टक्के इतका झाल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर येणाऱ्या एक-दोन दिवसात यातून पाणी सोडण्याचीही वेळ येऊ शकते. यादरम्यान पाटबंधारे विभागाने पत्र जारी करीत पेंच व कन्हान नदीच्या काठाने राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.मध्यप्रदेशमध्ये सुरूअसलेल्या मुसळधार पावसामुळे चौराई धरणातील सहा गेट उघडण्यात आले असून, त्यातून १४०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे गेल्या २४ तासात १३ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा तोतलाडोह धरणात वाढला आहे. तसेच येत्या २४ तासात तोतलाडोह ९६ टक्के भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत तोतलाडोह ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत.तोतलाडोहची डेड स्टॉकसह एकूण पाणीसाठा क्षमता ११६६.९३ दलघमी इतकी आहे. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ९३४.९८ दलघमी पाणी धरणात जमा झाले होते. चौराई धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने यात सायंकाळपर्यंत आणखी वाढ होत आहे. तोतलाडोह धरण ६५ टक्के भरताच नागपुरातील पाण्याचे संकट दूर झाले होते. परंतु आता धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर पोहोचले आहे.महिनाभरातच भरले धरण९ ऑगस्टपर्यंत तोतलाडोह धरणातील पाणीसाठा ० टक्के इतका होता.त्यामुळे ऐन पावसाळ्यात शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाणी वाचवण्याच्या उद्देशाने शहरात एक दिवसाआड पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर चौराई धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढू लागला. त्यामुळे ते धरण हाऊसफुल्ल झाल्याने त्यातील पाणी सोडण्याची वेळ आली. परिणामी तोतलाडोह जलाशयात पाणी जमा होऊ लागले. १० ऑगस्ट रोजी येथील पाणीसाठा ०.५८ टक्के इतका झाला. चौराई धरणातून १५ ऑगस्टपासून सातत्याने पाणी सोडले जात असल्याने ९ सप्टेंबरपर्यंत तोतलाडोह ८६.३७ टक्क्यांवर पोहोचला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत तोतलाडोहमध्ये ४५ टक्के इतका पाणीसाठा होता. तोतलाडोह भरल्यामुळे एकीकडे शहरातील नागरिकांना आनंद झाला आहे, तर दुसरीकडे सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनाही आनंद झाला आहे.पेंच व कन्हान नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारातोतलाडोह धरण ८६ टक्क्यांपेक्षा जास्त भरल्यामुळे येत्या एक किंवा दोन दिवसात धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जलशयातून विसर्ग नदीत सोडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पेंच व कन्हान नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून, लोकांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी व शासनाकडून मिळत असलेल्या सूचनांवर लक्ष ठेवून त्याचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी सांगितले आहे. गावातील नागरिकांसाठी १०७७ किंवा ०७१२-२५६२६६८ या आपात्कालीन टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सांगितले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी