शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

नागपुरात मुसळधार पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:16 IST

दोन दिवस तुरळक प्रमाणात आल्यानंतर बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह तासभर आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभरात शहरामध्ये ४८.१ मिमी पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देदिवसभरात ४८.१ मिमी पावसाची नोंद : रस्ते जलयम, सखल भागात पाणीच पाणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दोन दिवस तुरळक प्रमाणात आल्यानंतर बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह तासभर आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दिवसभरात शहरामध्ये ४८.१ मिमी पावसाची नोंद झाली. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले तर सखल भागात पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, वातावरणात दिवसभर थंडावा जाणवत होता. 

 बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात ४.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. सकाळपासून शहरात काळे ढग दाटून आले होते. दुपारी ११.३० नंतर पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. तासभर पावसाचा जोर जास्त होता. अनेक रस्ते खड्डेमय झाले असून त्यात पाणी जमल्याने वाहनचालकांची वाहने चालविताना कसरतच झाली. मेट्रो रेल्वे कॉरीडोर, पारडी आणि सदर येथील निर्माणाधीन उड्डाण पूल, अपूर्ण कार्य झालेले सिमेंट रस्ते या ठिकाणी पाणी जमले होते. शिवाय जुना भंडारा मार्ग, रेल्वे क्रॉसिंगजवळ गुडघाभर पाणी होते. सूर्यनगर परिसरातदेखील अशीच स्थितीत होती. लोखंडी पुलाजवळील माता मंदिर व मानस चौकात तर खड्ड्यांत पाणी जमले होते व यामुळे काही वाहनचालकांना प्रचंड अडचण झाली. नरेंद्र नगर पुलाखालीदेखील पाणी जमा झाले होते. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली होती. उत्तर व पश्चिम नागपुरातील अनेक भागांतदेखील पाणी साचले होते.वातावरणात थंडावामागील काही दिवसांपासून शहरातील वातावरणात काहिसा उकाडा वाढला होता. मात्र बुधवारी झालेल्या पावसामुळे थंडावा निर्माण झाला. शहरात कमाल २८.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान ४.५ अंशांनी कमी होते तर किमान २३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.सरासरीहून अधिक पाऊसनागपुरात २५ सप्टेंबरपर्यंत १०९७.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीहून हे प्रमाण २३ टक्क्यांनी अधिक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांत तसेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलादेखील पाऊस राहणार आहे. शिवाय पुढील २४ तासांत देखील पाऊस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर