शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

नागपुरात ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:36 AM

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ऑरेंज सिटी क्रॉफ मेळावा आणि लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन ४ ते १३ जानेवारीदरम्यान सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात करण्यात येणार आहे. महोत्सव दुपारी २ ते रात्री ९.३० पर्यंत सुरू राहील.

ठळक मुद्देदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ऑरेंज सिटी क्रॉफ मेळावा आणि लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन ४ ते १३ जानेवारीदरम्यान सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात करण्यात येणार आहे. महोत्सव दुपारी २ ते रात्री ९.३० पर्यंत सुरू राहील.केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवाडकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, यंदा महोत्सवाचे २६ वे वर्ष आहे. उद्घाटन ४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार असून या प्रसंगी महापौर नंदा जिचकार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि आयकर आयुक्त राजीव रानडे उपस्थित राहतील. विविध राज्यातील कारागिरांचे १२५ स्टॉल आणि फूड झोनमध्ये ३० स्टॉल राहणार आहे. महोत्सवात दररोज सायंकाळी ६.३० वाजता विविध राज्यातील आदिवासी कलावंत नृत्य आणि नृत्यनाटिका सादर करतील. केंद्र परिसराची सजावट पारंपरिक लोककलाकारांतर्फे करण्यात येत आहे. लोकांना विविध राज्यातील वस्तू खरेदीची संधी आहे.

 

टॅग्स :South Cental Zone Cultural Centre, Nagpurदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रcultureसांस्कृतिक