शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

गोधनी-कळमना कॉर्डलाईनची आज पाहणी

By admin | Updated: July 20, 2014 01:22 IST

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी आज शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकाचा दौरा करून तेथील वेटिंग हॉलची पाहणी करून पश्चिमेकडील संगणकीय आरक्षण कार्यालयाचे उद्घाटन केले.

दोन्ही ‘जीएम’ करणार निरीक्षण : संगणकीकृत आरक्षण केंद्राचे उद्घाटननागपूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी आज शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकाचा दौरा करून तेथील वेटिंग हॉलची पाहणी करून पश्चिमेकडील संगणकीय आरक्षण कार्यालयाचे उद्घाटन केले. दरम्यान, कोराडी पॉवर प्लान्टचा विस्तार आणि कोळशाच्या वाढत्या मागणीकडे पाहून उद्या रविवारी दपूम रेल्वेचे महाव्यवस्थापक नवीन टंडन आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद संयुक्तपणे कळमना-गोधनी कॉर्डलाईनची आणि नागपूर-कळमना डबलिंगची आणि कळमना-गोधनी कॉर्डलाईनच्या कामाची पाहणी करणार आहेत.मध्य रेल्वेचे ‘जीएम’ सुनील कुमार सूद आज विदर्भ एक्स्प्रेसने नागपुरात आले. त्यांनी ‘डीआरएम’ कार्यालयातील ‘इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स प्रणाली’चे तसेच ‘ई अटेंडन्स कम मस्टर प्रणाली’चे उद्घाटन केले. त्यांनी रेल्वे रुग्णालयात डॉक्टर्स सायंटिफिक फोरमतर्फे आयोजित ‘व्हिजन २०१४ : रिचिंग बियॉन्ड द हॉरिजन’ कार्र्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी रेल्वे बोर्डाचे आरोग्य सल्लागार डॉ. बी. बी. अग्रवाल, मुख्य आरोग्य संचालक डॉ. सोमपाल, ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह उपस्थित होते. मागील अनेक दिवसांपासून कळमना-नागपूर डबलिंगचे काम अपूर्ण आहे.याशिवाय कळमना-गोधनी दुसऱ्या कॉर्डलाईनचे कामही मंदगतीने सुरू आहे. कळमना डबलिंगचे काम सन २०१३-१४ मध्ये पूर्ण होणार होते. ६ किलोमीटरच्या या डबललाईनचे काम नोगा फॅक्टरी ते मोहननगरपर्यंत ६०० मीटर अडकून पडले आहे. या भागातील अतिक्रमणाचे काम मध्य रेल्वेच्यावतीने होऊ शकले नाही. कळमना-गोधनी दुसऱ्या कॉर्डलाईनचे कामही महसुलाच्या दृष्टीने पूर्ण होणे गरजेचे आहे. १३.७ किलोमीटर लांबीच्या या कॉर्डलाईनमुळे बिलासपूर ते इटारसी जाणाऱ्या मालगाड्यांना नागपूरला पोहोचण्यासाठी २.३० ते ३ तासांचा कालावधी यामुळे लागणार नाही. दुसरी कॉर्डलाईन नसल्यामुळे या गाड्या नागपूरला येऊन इंजिनची दिशा बदलविल्यानंतर पुढे जातात. या योजनेचे काम फक्त ६ किलोमीटर पूर्ण झाले. महाजनकोतर्फे कोराडी थर्मल पॉवर स्टेशनच्या विस्तारासाठी आणि गोधनी सायडिंगवर नजीकच्या काळात वाढणाऱ्या हालचालींना पुढे ठेवून ही कॉर्डलाईन महत्त्वाची ठरणार आहे. नागपूर-कळमना दुहेरीकरणाबाबत दपूम रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक तन्मय मुखोपाध्याय यांनी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मध्य रेल्वेचे ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी अतिक्रमणाबाबत रविवारी बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकारी काही काम करण्याऐवजी वाट पाहण्यात वेळ दवडत असल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)