गोधनी-कळमना कॉर्डलाईनची आज पाहणी

By Admin | Updated: July 20, 2014 01:22 IST2014-07-20T01:22:15+5:302014-07-20T01:22:15+5:30

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी आज शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकाचा दौरा करून तेथील वेटिंग हॉलची पाहणी करून पश्चिमेकडील संगणकीय आरक्षण कार्यालयाचे उद्घाटन केले.

Today's inspection of the pillow-cordony cordillation | गोधनी-कळमना कॉर्डलाईनची आज पाहणी

गोधनी-कळमना कॉर्डलाईनची आज पाहणी

दोन्ही ‘जीएम’ करणार निरीक्षण : संगणकीकृत आरक्षण केंद्राचे उद्घाटन
नागपूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी आज शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकाचा दौरा करून तेथील वेटिंग हॉलची पाहणी करून पश्चिमेकडील संगणकीय आरक्षण कार्यालयाचे उद्घाटन केले. दरम्यान, कोराडी पॉवर प्लान्टचा विस्तार आणि कोळशाच्या वाढत्या मागणीकडे पाहून उद्या रविवारी दपूम रेल्वेचे महाव्यवस्थापक नवीन टंडन आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद संयुक्तपणे कळमना-गोधनी कॉर्डलाईनची आणि नागपूर-कळमना डबलिंगची आणि कळमना-गोधनी कॉर्डलाईनच्या कामाची पाहणी करणार आहेत.
मध्य रेल्वेचे ‘जीएम’ सुनील कुमार सूद आज विदर्भ एक्स्प्रेसने नागपुरात आले. त्यांनी ‘डीआरएम’ कार्यालयातील ‘इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्स प्रणाली’चे तसेच ‘ई अटेंडन्स कम मस्टर प्रणाली’चे उद्घाटन केले. त्यांनी रेल्वे रुग्णालयात डॉक्टर्स सायंटिफिक फोरमतर्फे आयोजित ‘व्हिजन २०१४ : रिचिंग बियॉन्ड द हॉरिजन’ कार्र्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी रेल्वे बोर्डाचे आरोग्य सल्लागार डॉ. बी. बी. अग्रवाल, मुख्य आरोग्य संचालक डॉ. सोमपाल, ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह उपस्थित होते.
मागील अनेक दिवसांपासून कळमना-नागपूर डबलिंगचे काम अपूर्ण आहे.याशिवाय कळमना-गोधनी दुसऱ्या कॉर्डलाईनचे कामही मंदगतीने सुरू आहे. कळमना डबलिंगचे काम सन २०१३-१४ मध्ये पूर्ण होणार होते. ६ किलोमीटरच्या या डबललाईनचे काम नोगा फॅक्टरी ते मोहननगरपर्यंत ६०० मीटर अडकून पडले आहे. या भागातील अतिक्रमणाचे काम मध्य रेल्वेच्यावतीने होऊ शकले नाही. कळमना-गोधनी दुसऱ्या कॉर्डलाईनचे कामही महसुलाच्या दृष्टीने पूर्ण होणे गरजेचे आहे. १३.७ किलोमीटर लांबीच्या या कॉर्डलाईनमुळे बिलासपूर ते इटारसी जाणाऱ्या मालगाड्यांना नागपूरला पोहोचण्यासाठी २.३० ते ३ तासांचा कालावधी यामुळे लागणार नाही. दुसरी कॉर्डलाईन नसल्यामुळे या गाड्या नागपूरला येऊन इंजिनची दिशा बदलविल्यानंतर पुढे जातात. या योजनेचे काम फक्त ६ किलोमीटर पूर्ण झाले.
महाजनकोतर्फे कोराडी थर्मल पॉवर स्टेशनच्या विस्तारासाठी आणि गोधनी सायडिंगवर नजीकच्या काळात वाढणाऱ्या हालचालींना पुढे ठेवून ही कॉर्डलाईन महत्त्वाची ठरणार आहे. नागपूर-कळमना दुहेरीकरणाबाबत दपूम रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक तन्मय मुखोपाध्याय यांनी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मध्य रेल्वेचे ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांनी अतिक्रमणाबाबत रविवारी बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकारी काही काम करण्याऐवजी वाट पाहण्यात वेळ दवडत असल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's inspection of the pillow-cordony cordillation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.