शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

आज प्रपोज डे; करा जिवलगासोबत ‘मन की बात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 10:02 AM

तुम्ही एखाद्यावर प्रामाणिक प्रेम करत असाल तर या प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी प्रपोज डे हा उत्तम पर्याय आहे.

ठळक मुद्देसांगा ‘त्या’ला तुमच्या मिठीत स्वर्ग आहे सारा...

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काल दिलात ना लालबुंद गुलाब? या गुलाबाने पोहोचवलाच असेल तुमच्या भावनांचा अलवार गंध जिवलगाच्या हृदयापर्यंत. पण, भाषा नजरेची असो वा फुलांची, त्यांना हवाच असतो शब्दांचा आश्वस्त साज. हे शब्द केवळ बाराखडीतली अक्षरे नसतात. हे वचन असते निष्ठेचे, समर्पणाचे. तुम्ही एखाद्यावर प्रामाणिक प्रेम करत असाल तर या प्रेमाच्या अभिव्यक्तीसाठी प्रपोज डे हा उत्तम पर्याय आहे. आता एक करा...आपल्या जिवलगासमोर मोरासारखे छाती काढून उभे रहा,  नजरेत नजर बांधून पाहा... सांगा त्याला, तुमच्या मिठीत स्वर्ग आहे सारा. जास्तीत जास्त काही होईल नकार मिळेल. पण, ‘मन की बात’ सांगितल्याचे समाधान त्याहून कितीतरी जास्त असेल आणि काय सांगावे, कदाचित तुमच्या पदरात होकाराचे दानही पडेल.

कुणाला फसवू नका प्लीज‘मंदिर टुटे तो बन जाये, ...दिल ना किसी का टुटने पाये...’ असे जे म्हणतात ना, ते खरयं अगदी. समर्पणाशिवाय प्रेम हा निव्वळ भ्रम नाही, शुद्ध फसवणूक आहे. प्रपोज डेचा सोयीचा अर्थ काढून कुणाला फसवू नका. तुमचा हा क्षणिक स्वार्थ एखाद्याच्या जीवावरही बेतू शकतो. प्रेम जीव लावायला शिकवते, जीव घ्यायला नाही हे विसरू नका. एवढी नैतिकता पाळणार असाल तर हा दिवस तुमचाच आहे. ‘सो...लेटस् एन्जॉय प्रपोज डे’काळ आॅनलाईनचा आहे. त्यामुळे तुमच्या प्रेमाच्या प्रस्तावाचा एक व्हिडीओ तयार करा आणि द्या पाठवून आपल्या आवडत्या व्यक्तीला. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तर जिंकलातच तुम्ही.फुलांचा अन् प्रेमाचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे अगदी ठरवून बागेत भेटा. चौफेर बहरलेल्या फुलांच्या साक्षीने सांगून टाका तुमच्या मनातील भावना. होकार मिळाला तर ही बाग आयुष्यभर स्मरणात राहील.तुम्हा दोघांनाही वाफाळती कॉफी आवडते का? आवडत असेल तर थेट कॅफे हाऊस गाठा. कॉफीवर हृदयचा आकार आणि त्यात आवडत्या व्यक्तीचे नाव लिहायला सांगा. तुम्ही काहीच बोलू नका. तो कॉफीचा कप तेवढा त्याच्या पुढे ठेवा. तोच कपच वाचून काढेल तुमच्या प्रेमाचा कशिदा.

टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीक