शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून संघभूमीत संत-महंतांची मांदियाळी

By admin | Updated: December 23, 2016 01:31 IST

देव, देश,धर्मकार्याकरिता सज्जनशक्ती निर्माण व्हावी व हिंदू संस्कृतीतून वर्तमान प्रश्नांवर युगानुकूल समाधान समोर यावे,

धर्मसंस्कृती महाकुंभाचा शंखनाद : सीमाक्षेत्रातील मठ-मंदिर करणार सैन्याला मदत नागपूर : देव, देश,धर्मकार्याकरिता सज्जनशक्ती निर्माण व्हावी व हिंदू संस्कृतीतून वर्तमान प्रश्नांवर युगानुकूल समाधान समोर यावे, यासाठी आयोजित धर्मसंस्कृती महाकुंभाचा शुक्रवारी शंखनाद होणार आहे. नेपाळपासून रामेश्वरमपर्यंतचे १ हजार ११८ संत-महंत या निमित्ताने नागपुरात येणार आहेत. या धर्मसंस्कृीत महाकुंभाच्या निमित्ताने पुरोगामी मुद्यांवरदेखील मंथन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे संत-साधू व भारतीय सैन्यदल यांच्यातील समन्वयवाढ करण्यासाठी आयोजित ‘प्रेरणासंगम’ तसेच देशातील मातांमध्ये राष्ट्रभक्तीचा जागर करण्यासाठी आयोजित ‘मातृसंसद’ या महाकुंभाची विशेषता राहणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महाकुंभात राष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्या साधू-संतांमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महंतांचादेखील समावेश आहे. हिंदू समाजाच्या वैदिक परंपरा व संप्रदाय परंपरेचे साधू सहभागी होतील. शिवाय विश्व मांगल्य सभेत देशभरातील साध्वींचेदेखील आगमन होणार आहे. या त्रिदिवसीय महाकुंभात भारतातील शेकडो महापुरुष आणि श्रीक्षेत्राहून आलेल्या चरण पादुका तथा प्रासादिक धर्मचिन्हे, समस्त जगद्गुरू शंकराचार्य, विविध संप्रदायांचे जगद्गुरू, आचार्य, महामंडलेश्वर, सांप्रदायिक संत यांच्या समवेत समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहतील. भारतीयांची वैश्विक दृष्टी, नाते जपण्याची कला, नात्यांमधील मधुर भावसंबंध, व्रतवैकल्यातील पर्यावरणपूरक विचार आणि युगानुकूल समाधान यावर या महाकुंभात विचार होईल. सैन्य-साधू यांच्यातील समन्वय वाढविणार साधू व सैन्य यांच्यात समन्वय वाढावा यावरदेखील या महाकुंभात भर राहणार आहे. देशाच्या सीमाक्षेत्रात अनेक साधू-संत तपस्या करतात. या साधूंचा व सैन्यदलाचा समन्वय वाढीस लागावा तसेच सैन्याची मानसिक ऊर्जा वाढीस लागावी यासंदर्भात येथे मंथन होणार आहे. साधूंना सैन्यदलाशी जोडण्याच्या या प्रयत्नाअंतर्गत भारतीय सैन्यदलाचे सेवानिवृत्त अधिकारीदेखील धर्मसंस्कृती महाकुंभात सहभागी होणार आहेत. देशात सर्वदूर कुठेही राहाणारा सैनिक, पूर्व सैनिक, शहीद जवान यांच्या कुटुंबीयांना संत आणि समाजाचा भक्कम आधार मिळावा यासाठी ‘प्रेरणासंगम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.