Tirupade Birthday Journalism Award to Pune Prasun Vajpayee | पुण्यप्रसून वाजपेयी यांना तिरपुडे जन्मशताब्दी पत्रकारिता पुरस्कार
पुण्यप्रसून वाजपेयी यांना तिरपुडे जन्मशताब्दी पत्रकारिता पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व स्व. बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांना जाहीर करण्यात आला आहे. बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी समितीच्यावतीने संस्थेचे सचिव जयंत ऊर्फ बाबा कोंबाडे यांनी शनिवारी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेत याची घोषणा केली. एक लाख रुपये रोख व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दिवंगत तिरपुडे यांचे पत्रकारितेतील कार्यक्षेत्र लक्षात घेता, त्यांच्या स्मृतीत पत्रकारिता पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्यप्रसून वाजपेयी हे देशातील ज्येष्ठ पत्रकार असून ते वृत्तनिवेदक, संपादक आणि लेखकही आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये कार्य करीत आहेत.येत्या १६ जानेवारी रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सकाळी ९.३० वाजता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे अध्यक्षस्थानी राहतील, तर महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र प्रमुख अतिथी राहतील.

Web Title: Tirupade Birthday Journalism Award to Pune Prasun Vajpayee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.