शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

नोटा फाडणे हा देशद्रोह; किरीट सोमय्यांच्या वर्तनावर दिवाकर रावतेंचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:48 AM

 एका बाजूला भाजपाची कूटनीती आहे तर दुसºया बाजूला बेधडक शिवसैनिक आहे.

भाजपाचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी हातगाडी चालविणाऱ्याच्या जवळील नोटा घेऊन फाडल्या. यावर रावते म्हणाले, खासदाराने नोटा फाडणे यावर केंद्रीय अर्थमंत्री व रिझर्व्ह बँकेचे प्रमुख काय मत देतात ते महत्त्वाचे आहे. नोटांवर देश चालतो, ही राष्ट्रीय मुुद्रा आहे. त्यामुळो नोटा फाडणे हा राजद्रोह आहे का, असेल तर काय शिक्षा व्हावी, यावर विचार व्हावा. एका बाजूला भाजपाची कूटनीती आहे तर दुसºया बाजूला बेधडक शिवसैनिक आहे. त्यामुळे कुणाचीही चिंता वाटत नाही. शिवसेना स्वबळावर विदर्भातील सर्व ६२ जागा लढविणार असून चांगले यशही मिळवून दाखवेल, असा विश्वास शिवसेनेचे संपर्क प्रमुख व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केला.विदर्भातील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी रावते हे बुधवारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी भंडारा- गोंदिया व नागपूर अशा तीन जिल्ह्यांचा आढावा घेतला. बैठकीनंतर पत्रकारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निरंजन डावखरे यांनी भाजपात प्रवेश केल्याकडे लक्ष वेधले असता रावते म्हणाले, भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष आहे. इतर पक्षातून माणसे घेऊन निवडणुका लढवायचे काम भाजप करीत आहे. आयातीवरच पक्ष चालणार असेल तर एक दिवस ते त्यांना चांगलेच महागात पडेल. लोकशाही व घटनेचा सन्मान करणाºया पक्षाचा जनता सन्मान करते. हे कर्नाटकने दाखवून दिले आहे.शिवसेनेने भाजपाची साथ सोडली तर शिवसेनेचे आमदार फुटतील, या रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. आठवले विनोद करतात, हे माहीत आहे. ते एवढा राष्ट्रीय विनोद करतील हे माहीत नव्हते, अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडविली.

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावतेKirit Somaiyaकिरीट सोमय्या