शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
8
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
9
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
10
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
11
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
12
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
13
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
14
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
17
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
18
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
19
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
20
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिळा तिळा दार उघड !

By admin | Updated: May 16, 2014 00:40 IST

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणुकीत कुणाच्या बाजूने कौल दिला यासाठी तब्बल सव्वा महिन्यापासूनची प्रदीर्घ प्रतीक्षा उद्या, शुक्रवारी संपणार आहे.

आज होणार फैसला - सर्वांचाच विजयाचा दावा

नागपूर: नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी निवडणुकीत कुणाच्या बाजूने कौल दिला यासाठी तब्बल सव्वा महिन्यापासूनची प्रदीर्घ प्रतीक्षा उद्या, शुक्रवारी संपणार आहे. सकाळी १0 वाजेपर्यंत निकालाचा पहिला कौल मिळण्याची शक्यता आहे. आपणच विजयी होऊ, असा दावा करीत उमेदवारांनी संसदेत जाण्यासाठी ‘तिळा तिळा दार उघड’ म्हणणे सुरू केले आहे. आता मतदार कुणासाठी संसदेचे दार उघडतात, हे प्रत्यक्ष मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. ‘नॅशनल फेस’ असलेले उमेदवार रिंगणात असल्याने या दोन्ही लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एवढेच नव्हे तर वृत्तवाहिन्यांवरील एक्झिट पोलने देशभरात उभारलेल्या चित्रामुळे नागपूर व रामटेकमध्ये कोण ‘एक्झिट’ होईल, याबाबतची उत्सुकता मतदारांमध्ये वाढली आहे. कळमना मार्केट यार्डमध्ये सकाळी ८ वाजतापासून या दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.मतमोजणीस्थळी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असणार असून अधिकारी वगळता तेथे कुणालाही इलेक्ट्रॉनिक वस्तू (मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरे) नेण्यास मनाई करण्यात आली आहे,असे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी अभिषेक कृष्णा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

१0 एप्रिल रोजी नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले होते. संपूर्ण नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून

सर्वप्रथम म्हणजे ८ वाजता टपाल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. त्यासाठी दोन्ही मतदारसंघ मिळून एकूण चार टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. चार सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍याची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत टपाल मतांची मोजणी पूर्ण होईल. त्यानंतर ईव्हीएममध्ये नोंदवण्यात आलेल्या मतांची मोजणी सुरू होईल. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय २0 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ मिळून १२0 व रामटेक मतदारसंघासाठी तेवढेच असे एकूण २४0 टेबलवर एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी एकूण १४५0 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एका टेबलवर एकाच वेळी २0 मतदान यंत्रातील मतांजी मोजणी केली जाईल. रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण १८ तर नागपूर लोकसभा मतदारसंसघात एकूण १५ फेर्‍या होण्याची शक्यता आहे. रामटेकमध्ये कामठी विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राची संख्या सर्वाधिक म्हणजे ४५0 असल्याने तेथे २३ फेर्‍या होईल. तर नागपूरमध्ये उत्तर नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे ३३१ मतदान केंद्र असल्याने तेथे १७ फेर्‍या होतील.

पहिल्या फेरीला सरासरी ४५ मिनिट तर त्यानंतरच्या प्रत्येक फेरीला २0 ते ३0 मिनिट लागण्याची शक्यता आहे. पहिल्या फेरीचा निकाल स. १0 वाजता जाहीर केला जाईल. मतमोजणीची प्रक्रिया सर्वसाधारणपणे दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. निकाल जाहीर होण्यास सायं ५ किवा ६ वाजू शकतात, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. विजयी मिरवणूक काढण्यास प्रशासनाने बंदी घातली नाही. त्यासाठी पोलिसांकडून पूर्वपरवानगी घेण्याची गरज आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.पत्रकार परिषदेला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रदीप डांगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)