शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

उपराजधानीत हिवाळी अधिवेशनासाठी कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:43 AM

सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे सरकार नागपुरात येणार आहे. ठाकरे सरकारचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनादरम्यान आत-बाहेर कसलीही गडबड होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी सात दिवसांपूर्वीच बंदोबस्ताचा आराखडा तयार केला आहे.

ठळक मुद्देएटीसी, एएनओ आणि गुन्हे शाखा सक्रियबंदोबस्ताचा नवीन पॅटर्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत १६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताची पोलिसांनी तयारी पूर्ण केली आहे. यावेळीचा बंदोबस्त अधिकच कडक राहणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बंदोबस्ताचा पॅटर्न बदलवत अधिवेशनाच्या पूर्वीपासूनच दहशतवादी विरोधी सेल (एटीसी), नक्षलवादी विरोधी पथके (एएनओ) आणि गुन्हे शाखेची पथके सक्रिय केली आहे. झोपडपट्टी सर्चिंग आणि कोंम्बिग ऑपरेशनही सुरू करण्यात आले आहे.सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे सरकार नागपुरात येणार आहे. ठाकरे सरकारचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनादरम्यान आत-बाहेर कसलीही गडबड होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी सात दिवसांपूर्वीच बंदोबस्ताचा आराखडा तयार केला. कोण, कुठे राहील, कोणती जबाबदारी पार पाडेल, ते ठरवून देण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी बाहेर जिल्ह्यातून मोठ्या संख्येत पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोलवून घेतले जाते. त्यांनी गुरुवारपासून आमद (आगमनाची सूचना) देणे सुरू केले आहे. शुक्रवारपासून त्यांना तैनाती दिली जाणार आहे. बाहेरून येणाऱ्या पोलिसांच्या सोबतीला स्थानिक अधिकारी-कर्मचारी देऊन त्यांच्याकडून बंदोबस्त करवून घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, येथे कडाक्याच्या थंडीत कर्तव्यावर येणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला चांगले जेवण आणि उबदार निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर पोलीस आयुक्तांनी भर दिला आहे. कोणत्याही पोलिसांची जेवण आणि निवासाबाबतची कसलीही कुरबूर येऊ नये, त्यांना अंघोळीच्या गरम पाण्यापासून तो ओढण्यासाठी उबदार कपड्यांपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधीची जबाबदारी काही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर सोपवली आहे.

शनिवारी घेणार आढावाराज्य राखीव दलाच्या सात कंपन्यांसह राज्यभरातून जवळपास पाच हजार पोलीस बंदोबस्तासाठी नागपुरात येणार आहेत. शनिवारी सकाळी पोलीस महासंचालकही पोहचतील. ते एकूणच बंदोबस्ताचा आढावा घेतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके आणि कमांडोज राहणार असून त्यांचे निवासस्थान ‘रामगिरी’वर मोठा ताफा तैनात असणार आहे. तेथे तसेच आमदार निवास, रविभवन, नागभवन येथेही ओळखपत्रांशिवाय कुणालाही प्रवेश देण्यात येणार नाही.

विशेष सुरक्षा कवचपोलीस रात्रंदिवस बंदोबस्त ठेवणार आहेत. विधानभवन, नागभवन, रविभवन आणि आमदार निवास यासह विविध ठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. विधानभवनाला फोर्सवन, कमांडो, एसआरपीएफ, अतिजलद प्रतिसाद पथकाचे विशेष सुरक्षा कवच राहणार आहे. दंगल विरोधी पथक, जमाव हिंसक झाल्यास पाण्याचा मारा करणारे वरुण आणि वज्रसुद्धा सज्ज राहणार आहे.

मोर्चा पॉईंट सज्जसामाजिक संघटना, कर्मचारी संघटना मोर्चाच्या माध्यमातून विधानभवनावर धडकतात. या मोर्चांना मॉरिस कॉलेज टी-पॉईंट, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, टेकडी रोड, लिबर्टी टी-पॉईंट, एलआयसी चौक येथे रोखले जाईल. मोर्चांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक विभाग सक्रिय झाला असून फूटपाथ मोकळे करणे सुरू झाले आहे.

पोलिसांच्या सुट्या रद्दअधिवेशनादरम्यान स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. जे यापूर्वी सुट्यांवर गेले आहेत, अशांना परत बोलविले जाणार आहे. पोलिसांनी संवेदनशील भाग आणि झोपडपट्ट्यांवर नजर रोखली आहे. त्या ठिकाणी कारवाई सुरू होणार आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन