शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

नागपूर मनपाच्या ‘आपली बस’मध्ये तिकीट घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 9:43 PM

महापालिकेच्या शहर बसमधून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्यासाठी परिवहन विभागातर्फे ‘स्मार्ट कार्ड ’उपलब्ध केले जाते. कंडक्टरांनी या स्मार्ट कार्डचा गैरवापर करून लाखो रुपयांचा तिकीट घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देस्मार्ट कार्डचा दुरुपयोग : मनपाला लाखोंचा फटकासभापतींचे दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देेश

आॅनलाईन लोकमतनागपूर : महापालिकेच्या शहर बसमधून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्यासाठी परिवहन विभागातर्फे ‘स्मार्ट कार्ड ’उपलब्ध केले जाते. कंडक्टरांनी या स्मार्ट कार्डचा गैरवापर करून लाखो रुपयांचा तिकीट घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. तिकीट मशीन खरेदीचा घोळ गाजत असतानाच तिकिटांचा घोटाळा पुढे आल्याने परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.महापालिकेने ‘आपली बस’ शहर बससेवा सुरू केली आहे. बस  वाहतुकीचे  संचालन मार्च २०१७ पासून कंत्राटदारांमार्फत केले जात आहे. कंडक्टर तिकीट  विक्रीच्या माध्यमातून येणारा पैसा जमा करतात. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी डी.आय.एम.टी.एस., मे. युनिटी सिक्युरिटी फोर्स, मे.सिक्युरिटी अ‍ॅन्ड इंटीलिजन्स या कंपन्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानंतरही जून २०१७ पासून स्मार्ट कार्डच्या माध्यमातून तिकीट घोटाळा सुरू असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे महापालिकेला १२ ते १३ लाखांचा फटका बसला आहे.या घोटाळ्यात ६० कंडक्टर सहभागी आहेत. यातील ३५ जणांना निलंबित करण्यात आले आहे. परंतु यात सहभागी असलेले पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांवर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी अद्याप कोणत्याही स्वरूपाची कारवाई केलेली नाही. याची गंभीर दखल घेत परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी या प्रकरणात सहभागी असलेले कं डक्टर, पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांना निलंबित करून दोषींच्या विरोधात पोलिसात फौजदारी गुन्हे दाखल करा. अपहाराची रक्कम वसूल करून याबाबतचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले आहेत.असा झाला घोटाळाविद्यार्थी, दररोज प्रवास करणारे नोकरदार यांना परिवहन विभागाने पास स्वरूपात स्मार्ट कार्ड उपलब्ध केले आहे. हे कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा आहे. प्रवास करताना कंडक्टरला कार्ड दिल्यानंतर तो मशीनमध्ये स्वाईप करून तिकीट देतो. परंतु काही कंडक्टरकडे मोठ्या प्रमाणात हे कार्ड आढळून आले आहे. कार्डधारक प्रवास करीत नसला तरी त्याचे कार्ड स्वाईप करून प्रवाशांना तिकीट देऊन दररोज दीड ते दोन लाखांचा अपहार केला जात असल्याचा अंदाज आहे. ६० कंडक्टरकडे असे अनेक स्मार्ट कार्ड आढळून आले आहेत.स्मार्ट कार्ड वितरित करणारेही सहभागी?परिवहन विभागामार्फत वितरित करण्यात आलेल्या स्मार्ट कार्डचा दुरुपयोग होणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. स्मार्ट कार्ड कुणी वितरित केले. कंडक्टरला स्वाईप मशीन कुणी दिल्या. एका स्मार्ट कार्डचा दिवसभरात कितीवेळा वापर करण्यात आला, याची तपासणी करण्याची जबाबदारी स्मार्ट कार्ड वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे या घोटाळ्यात संबंधित अधिकारी सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.घोटाळेबाजांवर कारवाई का नाही?स्मार्ट कार्डच्या माध्यमातून सुरू असलेला तिकीट घोटाळा उघडकीस आल्यानंतर काही कंडक्टरला निलंबित करण्यात आले. परंतु स्मार्ट कार्ड कुणी उपलब्ध केले. ते कंडक्टरकडे कसे आले. यात अधिकारी सहभागी आहेत का, याचा शोध घेण्यासाठी विभागीय चौकशी होण्याची अपेक्षा होती. मात्र परिवहन विभागाने कारवाई करण्याचे टाळले. यामुळे संशय वाढला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडी