कामगिरीवरच होणार तिकीटवाटपाचा निर्णय; विनोद तावडे : माझा फोकस ओन्ली राष्ट्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 06:11 IST2023-12-17T06:10:00+5:302023-12-17T06:11:46+5:30
नागपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. २०१४ नंतर भाजपने देशातील राजकारणाच्या प्रणालीतच मोठे बदल घडविले आहेत.

कामगिरीवरच होणार तिकीटवाटपाचा निर्णय; विनोद तावडे : माझा फोकस ओन्ली राष्ट्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एखादा खासदार किंवा आमदार दोन किंवा तीन वेळा निवडून आला आहे, म्हणून त्याला तिकीट मिळणार असे होत नसते. पक्षाकडून तिकीटवाटपाअगोदर मागील पाच वर्षांतील त्याची कामगिरी विचारात घेतली जाते. खासदार-आमदारांच्या कामगिरीवरच तिकीटवाटप होईल, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी दिली.
नागपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. २०१४ नंतर भाजपने देशातील राजकारणाच्या प्रणालीतच मोठे बदल घडविले आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकांत मागील वेळपेक्षादेखील जास्त जागा मिळतील. विशेषत: बिहारमध्ये चमत्कार बघायला मिळेल, तर दक्षिण भारतासाठीदेखील विशेष नियोजन करण्यात आले आहे, असेही विनोद तावडे म्हणाले.
ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र
nदेशापातळीवर पक्षाकडून जी जबाबदारी देण्यात आली आहे त्यावरच माझा फोकस आहे. राष्ट्रीय मुद्दयाकडेच माझे लक्ष आहे.
nसध्या ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र अशीच माझी भूमिका आहे. पक्ष जे निर्देश देईल, त्याचेच पालन करेन, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
बिहार-यूपीमध्ये मोहन यादवांमुळे फायदा
देशात भाजपचे काम जनता पाहते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर लोकांना विश्वास आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदी चेहरे दिल्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला. मात्र मोहन यादव यांना मुख्यमंत्री बनविल्याचा फायदा बिहार व उत्तर प्रदेशमध्येदेखील होईल, असा दावा तावडे यांनी केला.