शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

ठगबाजी : अ‍ॅड. सतीश उके यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:28 IST

पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी बुधवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी के.एस. तोतला यांच्या न्यायालयाने आरोपी अ‍ॅड. सतीश महादेवराव उके यांना ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देपाच कोटींची जमीन हडपण्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी बुधवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी के.एस. तोतला यांच्या न्यायालयाने आरोपी अ‍ॅड. सतीश महादेवराव उके यांना ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.आर्थिक गुन्हेशाखेने उके यांना मंगळवारी अटक केली होती. पोलीस लाईन टाकळी राठोड लॉनजवळील रहिवासी शोभाराणी राजेंद्र नलोडे (६०) यांच्या तक्रारीवरून मंगळवारी ३१ जुलै २०१८ रोजी सतीश उके, चंद्रशेखर नामदेवराव मते आणि इतरांविरुद्ध भादंविच्या ४२०, ४२३, ४२४, ४४७, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४ कलमान्वये गुन्हे दाखल करून उके यांना अटक करण्यात आली होती.उके आणि सहकाऱ्यांनी नलोडे यांच्या मालकीची मौजा बाबूळखेडा खसरा क्रमांक ८२/२ मधील जमीन बनावट दस्तावेजांचा वापर करून हडपली होती. या बनावटगिरीचा प्रारंभ १६ मार्च २००१ पासून झाला होता.शोभाराणी नलोडे यांचे पती नलोडे यांनी विठ्ठल शंकरराव ढवळे यांच्याकडून १९९० मध्ये ४.७५ एकर जमीन विकत घेतली होती. त्यांनी ऐश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून या जमिनीवर ७८ प्लॉटस्चे ले-आऊट टाकून ते आपल्या सोसायटीच्या सभासदांना विकले होते. त्यानंतर २००१ मध्ये सतीश उके, चंद्रशेखर मते आणि इतरांनी गुन्हेगारी कट रचून या जमिनीचे मूळ मालक ढवळे आणि इतरांच्या नावे बनावट आममुख्त्यारपत्र चंद्रशेखर मते याच्या नावे असल्याचे दर्शविले. मते याच्याकडून२९ नोव्हेंबर १९९० मध्ये ही १.५ एकर जमीन खरेदी केल्याचे खरेदी खत तयार करून १६ मार्च २००१ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी केली.या जागेवर सोसयटीच्या मूळ भूखंडधारकांना येण्यास मज्जाव करून २० जणांना वेगवेगळे भूखंड विकून टाकले आणि मोठी ठकबाजी केली.या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ल.श. वर्टीकर यांनी आरोपी उके यांना न्यायालयात हजर केले. सरकारतर्फे १४ दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली. हा गुन्हा जन्मठेप तसेच दहा वर्षांवरील शिक्षेचा असल्याचे सांगण्यात आले. आरोपीकडून गुन्ह्याशी संबंधित दस्तावेज जप्त करून गुन्ह्यात सहभागी आरोपींना अटक करणे आहे. आरोपीच्या वकिलांकडून पोलीस कोठडीस विरोध करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सरकारी वकील रत्ना घाटे, आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सुदीप जयस्वाल, अ‍ॅड. शशीभूषण वाहणे यांनी काम पाहिले.

सात वर्षांपूर्वीही अटकउल्लेखनीय म्हणजे यापूर्वी सतीश उके आणि त्यांचे बंधू बडतर्फ पोलीस शिपाई प्रदीप उके यांना जमीन ठकबाजीच्या नऊ गुन्ह्यात २०११ मध्ये अटक करण्यात आली होती.

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजी