शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

 शिक्षणाच्या माध्यमातून ते घडवितात माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 21:23 IST

सर्वच क्षेत्रात सेवाभाव हरपत चालला असताना सेवानिवृत्तीनंतरही ११ वर्षे वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टरांना चांगला माणूस घडविण्यासाठी एक डॉक्टर झटतो आहे. मेडिकलच्या ‘रेडिओथेरपी अ‍ॅण्ड आॅन्कोलॉजी विभागा’चे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे हे ते नाव.

ठळक मुद्देडॉ. कृष्णा कांबळे : सेवानिवृत्तीनंतही ११ वर्षांपासून देत आहेत वैद्यकीय शिक्षणाचे धडेशिक्षक दिन विशेष

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सर्वच क्षेत्रात सेवाभाव हरपत चालला असताना सेवानिवृत्तीनंतरही ११ वर्षे वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टरांना चांगला माणूस घडविण्यासाठी एक डॉक्टर झटतो आहे. मेडिकलच्या ‘रेडिओथेरपी अ‍ॅण्ड आॅन्कोलॉजी विभागा’चे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे हे ते नाव.गरिबांसह आता सामान्यांचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयातील या विभागाच्या उभारणीचे श्रेय त्यानांच जाते. २००७ मध्ये डॉ. कांबळे सेवानिवृत्त झाले. त्यांना गलेलठ्ठ पगार देणाऱ्या नोकरीच्या बाहेर अनेक संधी होत्या. पण, पैशाच्या मागे न धावता मेडिकलमध्येच रुग्ण व विद्यार्थ्यांच्या अध्यापनात ते रमले. त्यांच्याच प्रयत्नामुळे २०११ मध्ये ‘रेडिओथेरपी अ‍ॅण्ड आॅन्कोलॉजी विभागा’त पदव्युत्तर शिक्षणाला सुरुवात झाली. एकीकडे कर्करोगाच्या मगरमिठीत अडकलेल्या रुग्णांना सोडविण्याचा ध्यास तर दुसरीकडे पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विषयाचे चांगले शिक्षण देऊन प्रामाणिकपणा, नीतिमत्तेचे धडे देत चांगला माणूस म्हणून डॉक्टर घडविण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.‘लोकमत’शी बोलताना डॉ. कांबळे म्हणाले, शिकविणे हे माझे ‘पॅशन’ आहे. एक उत्तम विद्यार्थी घडविणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती असते. सध्या सर्वच क्षेत्रातील परिस्थिती बदलते आहे. विशेषत: वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. यामुळे ज्ञानासोबतच कौशल्यप्राप्त व सुजाण विद्यार्थी घडविणे हे एक आव्हान ठरत आहे. म्हणूनच अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी स्वत:चा आदर्श विद्यार्थ्यांसमोर उभा करणे आवश्यक झाले आहे, तरच मूल्यसंस्कार, जीवनविषयक शिकवण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तार्किक विचारप्रवृत्तीचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजतील.

टॅग्स :Teacherशिक्षकnagpurनागपूर