शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

तीन तरुणींना कोरोना संसर्ग झाल्याचे केले व्हायरल,गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 10:36 PM

ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने तीन तरुणींना कोरोना संसर्ग झाल्याचा ठपका ठेवल्याची बाब एका पोर्टल चॅनलने सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविली.पोर्टल न्यूज चॅनलचे संपादक, एक तरुणी आणि अन्य एक व्यक्ती अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (उमरेड) : ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने तीन तरुणींना कोरोना संसर्ग झाल्याचा ठपका ठेवल्याची बाब एका पोर्टल चॅनलने सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविली. सदर चुकीच्या बातमीचे प्रसारण केल्यावरुन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा गुन्हा उमरेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. डॉ. सचिन धमगाये असे तक्रारकर्त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. पोर्टल न्यूज चॅनलचे संपादक, एक तरुणी आणि अन्य एक व्यक्ती अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.तरुणी ग्रामीण रुग्णालयात आल्या होत्या. त्यांची तपासणी मी स्वत: केली. त्यांनी कोरोना संसर्गाचा संशय असलेल्या महिलेच्या संपर्कात आल्याचे सांगितले होते. त्यावरून केस रिपोर्टवर तशी नोंद इंग्रजीत केल्याचे डॉ. धमगाये यांनी सांगितले. डॉ. सचिन धमगाये यांनी नमूद केलेल्या नोंदीनंतर सदर तरुणी नागपूर मेयोला तपासणीसाठी गेल्या. त्यांचा कोरोना निगेटिव्ह असा अहवाल आलेला आहे. उमरेड पोलीस ठाण्यात १८८, ३४ भादंवि, सहकलम ५४ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी