शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत ‘स्टार बस’ने घेतले २३ बळी

By admin | Updated: April 7, 2016 03:12 IST

उपराजधानीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या नागपूर शहर बससेवेच्या बसेसच्या चालकांच्या ...

६० बसेस भंगारात : ७.९३ कोटींचा कर थकविलानागपूर : उपराजधानीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या नागपूर शहर बससेवेच्या बसेसच्या चालकांच्या निष्काळजीपणामुळे गेल्या तीन वर्षांत ७९ अपघात झाले आहेत. यात २३ नागरिकांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली असून शहर बससेवेत समाविष्ट असलेल्या चालकांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत शहर बससेवेत समाविष्ट असलेल्या बस, त्यांची स्थिती, झालेले अपघात इत्यादींबाबत नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती. मनपाच्या परिवहन विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१३ ते २९ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत या बसेसमुळे झालेल्या अपघातात ६८ नागरिक जखमी झाले. या अपघातांबाबत न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इतके अपघात झाले असताना शहर बससेवा आॅपरेटर असलेल्या ‘व्हीएनआयएल’तर्फे (वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड) आतापर्यंत केवळ २ लाख २८ हजार १४५ रुपये इतकीच मदत देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)बसेसची दुरवस्थानागपूर शहर बससेवेत ४७० बसेस आहेत. यातील २३० बसेस या ‘व्हीएनआयएल’च्या आहेत, तर २४० बसेस ‘जेएनयूआरएम’ योजनेअंतर्गत मनपाला प्राप्त झाल्या आहेत. यातील ११० बसेस नादुरुस्त आहेत. तर ‘रिअर इंजीन’ असलेल्या ६० बसेस दुरुस्त होऊ शकत नसल्यामुळे त्या चक्क भंगारात टाकण्यात आल्या आहेत.१२ लाखांचा दंड‘व्हीएनआयएल’तर्फे शहर बससेवेतील बसेसची योग्य निगा राखण्यात येत नसल्याची नागरिकांची नेहमीच तक्रार असते. अनेक बसेसमध्ये तर बसणे म्हणजे दिव्यच असते. बसेसचा रखरखाव नसल्यामुळे मनपाने तीन वर्षांत ‘व्हीएनआयएल’ला ६ लाख ४९ हजारांचा दंड ठोठावला. तर मंजूर मार्गावर बस न चालविल्याबाबतदेखील ५ लाख ७९ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.७.९३ कोटींचा कर भरणार कधी ?शहर बस सेवेच्या तिकीट विक्रीतून येणारे सर्व उत्पन्न हे ‘व्हीएनआयएल’कडे जमा होते. प्रवासी कर व बालपोषण अधिभार रकमेचा भरणा ‘व्हीएनआयएल’ला करणे अनिवार्य आहे. ही रक्कम ७ कोटी ९३ लाख इतकी असून ती प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करण्यात यावी असे मूळ करारात नमूद करण्यात आले होते. हा कर अद्याप कंपनीने भरलेला नसून ही रक्कम भरण्यासाठी मनपातर्फे सतत पत्र पाठविण्यात येत आहेत. कंपनीने २०१२ ते २०१६ या कालावधीत बस विमा, पथकर इत्यादीसाठी ६ कोटी ७६ लाख ७२ हजार ९९७ इतकी रक्कम भरली आहे. परंतु कोट्यवधींचा थकीत कर भरल्या जाणार की नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.