शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
3
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
4
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
5
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
6
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
7
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
8
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
9
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
10
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
11
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
12
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
13
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
14
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
15
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
16
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
17
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
18
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
19
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
20
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!

ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने तीन रुग्णांचा मृत्यू, नागपूर मेडिकलमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 04:14 IST

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘अतिदक्षता विभाग-१’मधील ऑक्सिजन पुरवठा रविवारी पहाटे अचानक बंद ...

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘अतिदक्षता विभाग-१’मधील ऑक्सिजन पुरवठा रविवारी पहाटे अचानक बंद झाल्याने एकामागोमाग एक तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तूर्तास मेडिकल प्रशासनाने हे आरोप फेटाळले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवरत्न शेंडे (वय ५६, रा. सिद्धार्थनगर कोरोडी), अमोल नाहे (२४, रा. संग्रामपूर, बुलडाणा) व नरेश मून (६३, रा. महादुला) अशी मृत रुग्णांची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार, अमोल नाहे या युवकाला शुक्रवारी सकाळी, शिवरत्न शेंडे यांना शनिवारी सायंकाळी, तर नरेश मून या वृद्धाला रविवारी पहाटे ३ वाजता भरती करण्यात आले होते. कोरोना संशयित म्हणून तिघांवर उपचार सुरू होते. त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले. तिघांनाही ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ‘आयसीयू-१’मधील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. यामुळे तिन्ही रुग्णांचा मृत्यू झाला. अचानक रुग्णांच्या मृत्यूने गोंधळ उडाला. याची माहिती वरिष्ठांना मिळताच त्यांनी तातडीने दुरुस्ती करून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केला. ऑक्सिजन पुरवठा अर्ध्या तासापर्यंत खंडित झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

शनिवारी झाली होती ऑक्सिजनची गळतीशनिवारी ट्रॉमा केअर सेंटरच्या ‘आयसीयू’मध्ये ऑक्सिजनच्या पाईपलाईनमधून गळती झाली होती. एका सुरक्षा रक्षकाच्या लक्षात ही बाब लक्षात आली. त्याने तातडीने आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली. यामुळे मोठा धोका टळल्याचे सूत्राने सांगितले.प्रकरणाची चौकशी केली जाईलट्रॉमा केअर सेंटरमधील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा अद्ययावत प्रणालीने होतो. रविवारी पहाटे ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याचा रिपोर्ट नाही; परंतु यादरम्यान काही वेळेसाठी पुरवठा कमी-जास्त झाल्याची नोंद आहे. मृत्यू झालेल्या तिन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर होती. एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्याने त्याचा संबंध ऑक्सिजन खंडित झाल्याशी लावणे चुकीचे आहे. कुणाची तक्रार नसली तरी या घटनेची चौकशी केली जाईल.-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.

टॅग्स :Medicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरnagpurनागपूर