शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

खुनाच्या तीन घटनांमुळे उपराजधानी हादरली; चापट मारल्याचे आणि डुकरांच्या त्रासाचे निमित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 21:26 IST

Nagpur News जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांचा खून करण्यात आल्याच्या घटना पाचपावली आणि यशोधरानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

नागपूर : जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांचा खून करण्यात आल्याच्या घटना पाचपावली आणि यशोधरानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर सीताबर्डीत २६ मार्चला झालेल्या हाफ मर्डरमधील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या घटनेत पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ दिवसांपूर्वी चापट मारल्यामुळे संतप्त आरोपींनी आपल्या साथीदारांच्या मदतीने तरुणाचा खून केला. उमेश नरेंद्र नंदेश्वर (२४, रा. कांजी हाऊस चौक) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर आरोपींमध्ये अंशुल विष्णू पांडे (२२), शुभम नत्थुजी गजभिये (२६), अक्षय भीमराव वासनिक (२२), सम्यक संजय वासनिक (२५) आणि क्षितिज रत्नदीप लोखंडे (२२) (रा. आदर्शनगर) यांचा समावेश आहे. या खुनाचा सूत्रधार अंशुल पांडे आहे. तो चहा टपरी चालवतो. मृत उमेश नंदेश्वर हा वाहनचालक होता. उमेश, अंशुल आणि इतर आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. १५ दिवसांपूर्वी उमेश आणि अंशुल एका हळदीच्या कार्यक्रमात गेले होते. तेथे कोणत्या तरी कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी उमेशने अंशुलला चापट मारली. त्यामुळे अंशुल संतप्त झाला होता. तीन दिवसांपूर्वी पुन्हा दोघांमध्ये हाणामारी झाली. परंतु, तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या मित्रांनी मध्यस्थी केल्यामुळे प्रकरण शांत झाले. त्यानंतर अंशुल उमेशला धडा शिकविण्यासाठी संधी शोधू लागला. मंगळवारी रात्री ११ वाजता पाचपावलीच्या पंचशील चौकातील तक्षशिला बिल्डींगसमोर अंशुल आणि त्याच्या चार साथीदारांना उमेश दिसला. त्यांनी पुन्हा उमेशसोबत वाद घातला आणि धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले.

परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी जखमी उमेशला मेयो रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. नागरिकांनी उमेशची बहीण वैशाली हिला घटनेची माहिती दिली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिला सर्व घटनाक्रम समजला. पाचपावली पोलिसांनी खून आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. यातील अक्षय वासनिक बीएला शिकतो तर क्षितिज लोखंडे मार्केटिंगचे काम करतो. शुभम आणि संजय हे लहान-मोठे काम करतात. उमेशच्या कुटुंबात आई-वडील, दोन बहिणी आहेत. उमेशच्या कमाईवरच कुटुंबियांची उपजीविका भागत होती. त्याच्या खुनामुळे उमेशच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

यशोधरानगरात डुकरांच्या त्रासामुळे खून

यशोधरानगरात डुकरांच्या त्रासामुळे एकाचा खून केल्याची घटना घडली असून, दुसरा गंभीर जखमी आहे. धीरज चुटेलकर (वय ३५, रा. संतोषनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे तर जखमी आरोपी राजेश माणिकराव मन्ने (वय ४२, रा. गुलशननगर, कळमना) यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजेश स्टार बसचालक आहे. धीरज चुटेलकर आणि त्याचा भाऊ राहुल (२८) आणि शुभम (२५) हे डुक्कर पालन करतात. आरोपी राजेश पूर्वी संतोषनगरात चुटेलकर बंधूंच्या शेजारी राहत होता. त्यावेळी पाळलेले डुक्कर घाण पसरवत असल्यामुळे राजेशचा चुटेलकर बंधूंशी नेहमीच वाद होत होता. त्यामुळे राजेश दीड वर्षांपूर्वी संतोषनगरातील घर विकून गुलशननगरात राहण्यासाठी गेला. मंगळवारी सायंकाळी राजेश किराणा घेण्यासाठी संतोषनगरात आला. यावेळी त्याचा जुन्या गोष्टींवरून धीरजसोबत वाद झाला. राजेश तेथून परतला. रात्री ११ वाजता तो चाकू घेऊन संतोषनगरला गेला व त्याने धीरजवर हल्ला केला. चाकूने वार करून त्याने धीरजला जखमी केले. धीरजचा आरडाओरडा ऐकून त्याचा भाऊ राहुल आणि शुभम घराबाहेर आले. राजेशने त्यांच्यावरही हल्ला केला. धीरजच्या भावांनी राजेशकडून चाकू हिसकावून घेत त्याच्यावर चाकूने वार केले. मात्र, जखमी झाल्यानंतरही राजेशने दगडाने मारून राहुल आणि शुभमला जखमी केले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या धीरज आणि राहुल यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे धीरजचा मृत्यू झाला. यशोधरानगर पोलिसांनी राजेश मन्ने याच्याविरुद्ध खुनाचा आणि चुटेलकर बंधूंविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून धीरजचा भाऊ शुभमला अटक केली आहे.

मेयो रुग्णालयात तणाव

उमेश आणि धीरजला उपचारासाठी मेयो रुग्णालयात पोहोचविण्यात आले होते. तेथे त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले. दोघांचाही मृत्यू झाल्याचे कळताच नागरिक संतप्त झाले. त्यामुळे मेयो रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना तारेवरची कसरत करून नागरिकांना शांत करावे लागले.

हाफ मर्डरमधील जखमी तरुणाचा मृत्यू

‘हमारे एरिया मे क्यू रुके हो और यहा पर सिगरेट क्यू पी रहे हो’ असे म्हणून स्कुटीवर आलेल्या आरोपींनी मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या ईश्वर रामचंद्र बोरकर (वय २३, रा. राजुरा, जि. चंद्रपूर) याच्या छातीवर, पोटावर व हनुवटीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. बुधवारी उपचारादरम्यान ईश्वरचा मृत्यू झाला असून, सीताबर्डी पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २६ मार्च रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भोले पेट्रोल पंपाजवळ घडली होती. रोशन विलास साकीनाला (२४, रा. डब्ल्यूसीएल कॉलनी, राजुरा, जि. चंद्रपूर) हे आपला मित्र ईश्वर रामचंद्र बोरकर, आकाश वाघमारे (२१), भोला परचाके आणि राहिल शेख यांच्यासोबत भोले पेट्रोल पंपाजवळ व्हीआयपी रोडवरील जलप्रदाय कार्यालयासमोर बोलत उभे होते. तेवढ्यात २० ते २५ वयोगटातील तीन आरोपी तेथे आले. त्यांनी ‘हमारे एरिया मे क्यू रुके हो’ म्हणून मारहाण सुरू केली. ईश्वर भांडण सोडविण्यासाठी गेला असता, आरोपींनी त्याला खाली पाडून चाकूने त्याच्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. सीताबर्डी पोलिसांनी ईश्वरला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले होते. बुधवार, ५ एप्रिलला ईश्वरचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील आरोपींची नावे कळली असून, अद्याप आरोपी हाती लागले नसल्याची माहिती सीताबर्डीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिली.

 

................

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी