गोरेवाडातील ‘त्या’ बिबटाच्या तीन पिलांना मिळाले दत्तक पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 10:44 AM2020-08-11T10:44:24+5:302020-08-11T10:45:37+5:30

गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रामधील बिबटांच्या तीन पिलांना दत्तक पालक मिळाले आहेत. चार पिलांपैकी तिघांना वन्यजीवप्रेमींनी दत्तक घेतले आहे. प्रत्येक पिलाच्या देखभालीसाठी ५० हजार रुपयांचा खर्चही गोरेवाडा व्यवस्थापनाकडे सोपविला आहे.

Three cubs of 'that' leopard from Gorewada got adopted parents | गोरेवाडातील ‘त्या’ बिबटाच्या तीन पिलांना मिळाले दत्तक पालक

गोरेवाडातील ‘त्या’ बिबटाच्या तीन पिलांना मिळाले दत्तक पालक

googlenewsNext
ठळक मुद्देमोर्णा नदीकाठावर सापडली होती पिले जन्मापासूनच आईपासून विभक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रामधील बिबटांच्या तीन पिलांना दत्तक पालक मिळाले आहेत. चार पिलांपैकी तिघांना वन्यजीवप्रेमींनी दत्तक घेतले आहे. प्रत्येक पिलाच्या देखभालीसाठी ५० हजार रुपयांचा खर्चही गोरेवाडा व्यवस्थापनाकडे सोपविला आहे.
यातील चार पिलांपैकी एका नर पिलाला ए.आर. कन्स्ट्रक्शनने दत्तक घेतले असून त्याचे नाव ‘मुफासा’ ठेवले आहे. दुसरे मादी पिलू डॉ. आयुषी देशमुख यांनी दत्तक घेऊन त्याचे नाव ‘हंटर’ ठेवले आहे. तर तिसऱ्या मादी पिलाला डॉ. रोशन भिवापूरकर यांनी दत्तक घेऊन त्याचे नाव ‘डायना’ ठेवले आहे. ४ आॅगस्टला ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या पिलांना १६ जुलैला गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले होते. ३० जूनला अकोला येथील पातूर वनपरिक्षेत्रातील मोर्णा नदीच्या किनाºयावरील पास्टूल परिसरात असलेल्या झुडपांमध्ये ही पिले परिसरातील गावकऱ्यांना दिसली होती. पिलांना जन्म देऊन त्यांची आई निघून गेली होती. वनविभागाला या संदर्भात माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहचून या पिलांना आपल्या ताब्यात घेतले होते. त्यांची आई परत येइल, अशी अपेक्षा असल्याने त्यांना काही दिवस तिथेच सुरक्षित निगराणीखाली ठेवण्यात आले होते. मात्र आई न आल्याने चारही पिलांना गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात संगोपनासाठी आणले होते.

वाघ, अस्वलही दत्तक देणार
येथील बिबटाच्या चौथ्या पिलालाही दत्तक देण्याची तयारी गोरेवाडा प्रकल्पाने चालविली आहे. लवकरच त्यालाही दत्तक पालक मिळणार आहे. या सोबतच येथील वाघ, बिबट आणि अस्वलांनाही दत्तक दिले जाणार आहे.

 

Web Title: Three cubs of 'that' leopard from Gorewada got adopted parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.