नागपूर : खटवानी खून खटल्याचा गुंता अद्यापही सुटलेला नाही. या प्रकरणात पोलिसांनी पुन्हा तीन आरोपींना अटक केली असून, यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये निक्कू ऊर्फ नीलेश शंभू तांबे (२०) रा. मेकोसाबाग, ख्रिश्चन कॉलनी व शेख अशफाक शेख सलीम (३०) रा. बुरड गल्ली, तेलीपुरा आणि एक अल्पवयीन आरोपी आहे. यापूर्वी याप्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला अशफाक हा हत्याकांडाचा सूत्रधार शरीफ याचा मोठा भाऊ आहे. खटवानीच्या खुनाचा कट अशफाक व शरीफ याने रचला होता. तर निक्कू व अल्पवयीन आरोपीने मारेकऱ्यांना पळण्यासाठी सहकार्य केले होते. घटनेनंतर निक्कू व अल्पवयीन आरोपी मोटरसायकल घेऊन सीताबर्डीच्या रेल्वे पुलाजवळ उभे होते. या दोघांना त्यांनी ५०० रुपये दिले होते. न्यायालयाने अशफाक व निक्कू याला १७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
खटवानी खून प्रकरणात तीन आरोपींना अटक
By admin | Updated: March 14, 2015 02:42 IST