Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 18, 2025 13:10 IST2025-12-18T12:33:22+5:302025-12-18T13:10:37+5:30
Nagpur : एका अज्ञात आरोपीने गुरुवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना ई-मेल पाठवून न्यायालय परिसरामध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली आहे.

Threat to bomb Nagpur District Court by sending email to judge
नागपूर : एका अज्ञात आरोपीने गुरुवारी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना ई-मेल पाठवून न्यायालय परिसरामध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली असून परिसराची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
परिसरात कुठेही संशयित वस्तू आढळल्यास त्वरित पोलीस चौकीला माहिती द्यावी. तसेच अशा वस्तूला कोणीही हात लावू नये. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना वस्तूंची तपासणी व इतर तपासण्यांकरिता सहकार्य करावे, असे आवाहन न्यायालय प्रशासन व वकील संघटनेने केले आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाची पोलिसांनी तपासणी केली असता कोणतीही संशयित वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.