"कल तुझे २ बजे गोली मारूंगा..."; श्याम मानव यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 06:33 IST2023-01-24T06:31:15+5:302023-01-24T06:33:21+5:30

दिव्य दरबार’वरून चर्चेत आलेले मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधिश्वर धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे.

Threat message to Shyam Manav | "कल तुझे २ बजे गोली मारूंगा..."; श्याम मानव यांना धमकी

"कल तुझे २ बजे गोली मारूंगा..."; श्याम मानव यांना धमकी

नागपूर :

‘दिव्य दरबार’वरून चर्चेत आलेले मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधिश्वर धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. बागेश्वर महाराज यांना दिव्य शक्ती सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान देणारे जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तक्रारीनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून बंदूकधारी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Threat message to Shyam Manav