रुग्णालय उडविण्याची धमकी, गुन्हेगाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:56 IST2021-04-01T00:55:05+5:302021-04-01T00:56:10+5:30
Threat to blow up hospital रुग्णालय उडविण्याची धमकी देऊन एका गुन्हेगाराने कामठीत हैदोस घातला. कोरोना संक्रमनादरम्यान मिळालेल्या या धमकीमुळे डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली.

रुग्णालय उडविण्याची धमकी, गुन्हेगाराला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णालय उडविण्याची धमकी देऊन एका गुन्हेगाराने कामठीत हैदोस घातला. कोरोना संक्रमनादरम्यान मिळालेल्या या धमकीमुळे डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली.
कामठी येथे डॉ. अग्रवाल यांचे आशा रुग्णालय आहे. गोमकर नावाच्या एका गुन्हेगाराचा परिचित उपचारासाठी रुग्णालयात आला. रात्री ९ वाजता रुग्णाने व्हेंटिलेटर उपलब्ध करायला सांगितले. डॉक्टरांनी रुग्णाच्या प्रकृतीचा हवाला देत असे करण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या गोमकरने गोंधळ घातला. तो डॉक्टरांना रुग्णालय उडविण्याची धमकी देऊ लागला. गोंधळ घालून तो फरार झाला. कामठी पोलिसांनी रात्री गोमकरला ताब्यात घेतले. गोमकर विरुद्ध खून आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध मकोकाची कारवाईसुद्धा करण्यात आली आहे.