शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

धमक्यांमुळे गणवेश वाटप थांबले

By admin | Updated: July 8, 2015 02:56 IST

सर्वशिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाते. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातूनच याचे वाटप व्हावे, असे शासन निर्देश आहे.

मुख्याध्यापक धर्मसंकटात : जि.प.मध्ये चाललंय काय ?नागपूर : सर्वशिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाते. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातूनच याचे वाटप व्हावे, असे शासन निर्देश आहे. परंतु वर्कआॅर्डरच्या कोऱ्या अर्जावर सह्या व धनादेशासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मुख्याध्यापकांना धमक्या मिळत असल्याने बहुसंख्य शाळातील गणवेश वाटपाची प्रक्रिया थांबली आहे. पदाधिकाऱ्यांच्या ‘खाऊ ’ वृत्तीमुळे विद्यार्थ्यांना सायकलपाठोपाठ गणवेशही निकृष्ट दर्जाचा मिळणार असल्याचे धक्कादायक चित्र आहे.जिल्ह्यातील ८० हजार ४७३ विद्यार्थ्यांना गणवेश वाटपासाठी तीन कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. या निधीचे वितरण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मुख्याध्यापकांनी गणवेश खरेदीची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु स्थानिक स्तरावर गणवेश खरेदी न करता त्या रकमेचा धनादेश व वर्कआॅर्डरचा अर्ज पंचायत समितीस्तरावर जमा करण्याचे अलिखित आदेश शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी कामाला लागल्याने मुख्याध्यापकांपुढे धर्मसंकट उभे ठाकले आहे.व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गणवेश वाटपाचे शासन आदेश असतानाही खासगी कंत्राटदाराला गणवेश पुरवठ्याचे कं त्राट देण्याचा अट्टहास पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. हा प्रकार नियमबाह्य असल्याने काही मुख्याध्यापकांनी याला विरोध दर्शविला. त्यांना गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गप्प करण्यात आले. दुसरीकडे मुख्याध्यापकांना अधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणे शक्य नाही. या गोंधळात गणवेश वाटप रखडले आहे.जिल्ह्यातील १५८२ शासकीय शाळांतील ८०,४७३ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाणार आहे. यात ५३,३४८ विद्यार्थिनी तसेच अनुसूचित जाती ७,७५६, अनुसूचित जमाती ७,६३९ व दारिद्र्य रेषेखालील ११,७३0 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासनाकडून जून महिन्यात यासाठी निधी मिळाला. जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियान विभागातर्फे हा निधी वितरित करण्यात आला आहे. परंतु अलिखित आदेशाने प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. (प्रतिनिधी)अलिखित आदेशामुळे मुख्याध्यापक त्रस्तखासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून गणवेश वाटप करता येत नाही. याची जाणीव असल्याने नियमात अडकू नये यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना अलिखित आदेश देण्यात आले. त्यानुसार मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या. या प्रक्रियेला विरोध दर्शविणाऱ्या मुख्याध्यापकांना धमक्या मिळत आहे. अलिखित आदेशाच्या नवीन प्रथेमुळे मुख्याध्यापक व शिक्षकही त्रस्त आहेत.