मुंबईबाहेर गेलेल्यांना मुंबईत हक्काचे घर देणार; एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 07:12 IST2024-12-22T07:12:21+5:302024-12-22T07:12:36+5:30

नागपूर : विकासकांनी अर्धवट सोडलेल्या व रखडलेल्या धोकादायक इमारतींमुळे मुंबईकर मुंबईबाहेर गेला आहे. अशा बेघर व मुंबई बाहेर गेलेल्या ...

Those who have moved out of Mumbai will be given their rightful homes in Mumbai says Eknath Shinde | मुंबईबाहेर गेलेल्यांना मुंबईत हक्काचे घर देणार; एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही

मुंबईबाहेर गेलेल्यांना मुंबईत हक्काचे घर देणार; एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही

नागपूर : विकासकांनी अर्धवट सोडलेल्या व रखडलेल्या धोकादायक इमारतींमुळे मुंबईकरमुंबईबाहेर गेला आहे. अशा बेघर व मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देत त्यांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम शासन करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधान परिषदेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरील चर्चेदरम्यान दिली.

शिंदे म्हणाले, रखडलेल्या व धोकादायक पुनर्विकासासाठी इमारतींच्या शासनाने एमएसआरडीसी, एमआयडीसी, बीएमसी, म्हाडा, एसआरए, सिडको या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने योजना हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात २ लाख घरे पूर्ण करण्यात येणार आहे. सहभागी यंत्रणांना प्रत्येकी दोन ते तीन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देण्यात येतील. स्वयंविकासाच्या माध्यमातूनदेखील प्रोत्साहन देऊन रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. अशा योजनेची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी ठाणे शहरात सिडको आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पोलिसांच्या घरांविषयी सरकार सकारात्मक आहे. दुरवस्थेत असलेल्या पोलिस वसाहतींचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोकणातून ६५ टीएमसी वाहून जाणाऱ्या पाण्याच्या उपयोगासाठी छोटे, मोठे बंधारे बांधण्यात येणार आहे. सागरी किनारा रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवेश नियंत्रित हरीत महामार्ग शासन करणार आहे. यामुळे कोकणात निश्चितच पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
 

Web Title: Those who have moved out of Mumbai will be given their rightful homes in Mumbai says Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.