शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

त्या दोन बहिणींचा मृत्यू आजारपण आणि उपासमारीमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 11:25 PM

Two sisters died of illness and starvation जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील दाल ओळी नंबर २ येथील बंद घरात आढळलेल्या दोन बहिणांचा मृत्यू आजारपण आणि उपासमारीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज कामठी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भातील अंतिम अहवाल येत्या सात दिवसात देणार असल्याची माहिती डॉ.एस.के.वाघमारे यांनी दिली.

ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज : अंतिम अहवाल सात दिवसात येणार

लोकमत  न्यूज  नेटवर्ककामठी : जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील दाल ओळी नंबर २ येथील बंद घरात आढळलेल्या दोन बहिणांचा मृत्यू आजारपण आणि उपासमारीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज कामठी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भातील अंतिम अहवाल येत्या सात दिवसात देणार असल्याची माहिती डॉ.एस.के.वाघमारे यांनी दिली.बुधवारी दालओळी नंबर २ येथे एका बंद घरात पद्मा नागोराव लवटे (६०) आणि कल्पना लवटे (५०) यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत दोन्ही मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले होते. गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कामठी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. एस.के. वाघमारे यांनी शवविच्छेदन करून दोघींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले. यानंतर राणीतलाव मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रेखा विजय लवटे यांच्या तक्रारी वरून जुनी कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.जी.पाटील करीत आहेत.

दहा वर्षापूर्वी झाली होती अखेरची भेट

या घटनेची माहिती मिळताच मृत पद्मा व कल्पनाच्या धाकट्या बहिणी सुनिता नरेंद्र कंटाळे (३५) रा. इंदोर आणि अर्चना विजय इल्लापुरकर (४०) रा. बुलडाणा गुरुवारी दुपारी १२ वाजता सुमारास कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांना जुनी कामठीचे ठाणेदार विजय मालचे यांनी पद्मा व कल्पना संदर्भात माहिती विचारली असता कल्पना ही मानसिक आजाराने ग्रस्त होती तर पद्मा मिळेल ते काम करून घरचा उदरनिर्वाह करायची असे त्यांनी सांगितले. दहा वषापूर्वी आई-वडीलांच्या मृत्यूनंतर आज प्रथमच कामठीत आल्याचे त्यांनी पोलीसांना सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर