लगीनघाईला ग्रहांची मर्यादा, यंदा ४९ दिवसच मुहूर्त; टंचाईने हॉल-बुकिंग आणि बँडबाजांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 07:39 IST2025-10-27T07:39:42+5:302025-10-27T07:39:42+5:30
गुरूचा अस्त आणि शुक्राचा अस्त यामुळे यावर्षीचे ग्रहसंयोग विवाहयोगासाठी फारसे अनुकूल नाहीत.

लगीनघाईला ग्रहांची मर्यादा, यंदा ४९ दिवसच मुहूर्त; टंचाईने हॉल-बुकिंग आणि बँडबाजांची धावपळ
नागपूर : ‘उडवून द्या लग्नाचा बार!’ असे म्हणत घराघरांत लगीनघाईचा गजर सुरू झाला आहे. दिवाळीचा उजेड ओसरला, पण आता मंगलध्वनींची चाहूल लागली आहे. मात्र, या आनंदाच्या हंगामात ग्रह मात्र थोडेच मेहरबान राहणार? कारण यंदा विवाहासाठी फक्त ४९ दिवस शुभमुहूर्त, तर मुंजींसाठी अवघे २० दिवस शुभकाळ आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली.
गुरूचा अस्त आणि शुक्राचा अस्त यामुळे यावर्षीचे ग्रहसंयोग विवाहयोगासाठी फारसे अनुकूल नाहीत.
विवाहाचे शुभमुहूर्त
नोव्हेंबर २०२५ : २२, २३, २५, २६, २७, ३०
डिसेंबर २०२५ : २, ५
फेब्रुवारी २०२६ : ६, ७, १०, ११, १२, २०, २१, २२, २५, २६
मार्च २०२६ : ५, ७, ८, १४, १५, १६
एप्रिल २०२६ : २१, २६, २८, २९, ३०
मे २०२६ : १, ३, ६, ८, ९, १०, १३, १४
जून २०२६ : १९, २३, २४, २७
जुलै २०२६ : १, ३, ४, ७, ८, ११
मुंजीचे शुभमुहूर्त
फेब्रुवारी २०२६ : ६, १९, २२, २६, २७
मार्च २०२६ : ८, २०, २९
एप्रिल २०२६ : ३, ८, २१, २२, २८
मे २०२६ : ३, ६, ७, ८
जून २०२६ : १६, १७, १९