चोरट्यांनी लकडगंज, तहसील मध्ये व्यापारी प्रतिष्ठाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 00:08 IST2020-10-18T00:04:48+5:302020-10-18T00:08:37+5:30
Traders establishment broken Thieves, Crime news लकडगंज आणि तहसीलमधील दोन वेगवेगळी व्यापारी प्रतिष्ठाने फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली.

चोरट्यांनी लकडगंज, तहसील मध्ये व्यापारी प्रतिष्ठाने फोडली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लकडगंज आणि तहसीलमधील दोन वेगवेगळी व्यापारी प्रतिष्ठाने फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली. हिवरीनगरातील व्यापारी नीरज ओमप्रकाश अग्रवाल (वय ३६) यांचे लकडगंजमधील आंबेडकर चौकात कार्यालय आहे. शनिवारी पहाटे चोरट्याने शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कार्यालयातील १ लाख, ५० हजारांची रोकड चोरून नेली. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर अग्रवाल यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
जरीपटक्यातील दिनेश जेठानंद परियानी (वय ४०) यांचे तहसीलच्या सूत मार्केटमध्ये दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरटे आत शिरले. त्यांनी टेबलच्या ड्रॉवरमधील २ लाख, ४ हजार रुपये आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण २ लाख २४ हजारांचा ऐवज चोरून नेला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. परियानी यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.