दोन महिलांची चेन ओढून पळाला, सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या तावडीत सापडला
By योगेश पांडे | Updated: May 7, 2024 16:05 IST2024-05-07T16:03:08+5:302024-05-07T16:05:00+5:30
Nagpur : वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

Thief looted Two women with chains and run away, caught by police on CCTV
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन महिलांची चेन ओढून पळालेल्या आरोपीला काही वेळातच पकडण्यात पोलिसांना यश आले. सीसीटीव्हीमुळे चोरटा पोलिसांच्या तावडीत सापडला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सोमवारी रात्री साडेनऊ वाजता आते ले आऊट, म्हाडा कॉलनी येथील रहिवासी अरुण मनोज नंदुरकर (३७) या मंगलधाम अपार्टमेंटच्या मागील भागातून घरी पायी जात असताना पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील तीन ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. त्यानंतर पावणेअकरा वाजताच्या सुमारास भारती प्रशांत वासनिक (२४, सोनबा नगर, वाडी) या खडगाव मार्गावरील मैत्री व्यसनमुक्ती केंद्रासमोरून पायी जात असताना पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या आरोपीने मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. पोलिसांकडे या घटनांची तक्रार जाताच तांत्रिक माध्यमातून तपास सुरू करण्यात आला. गाडीची नंबर प्लेट व सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी रुपेश रमेश टिकले (२८, तिवारी ले आऊट, पुलगाव रोड, देवळी, वर्धा) याला अटक केली. त्याच्याकडून १५ हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच दुचाकी जप्त करण्यात आली.