तेथे सर्वत्र फक्त शांतताच -----

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 21:58 IST2020-05-13T21:54:50+5:302020-05-13T21:58:33+5:30

या रस्त्यांवरून लोक कधीही सर्रासपणे ये-जा करायचे. कधीही अडचण आली नाही. परंतु २२ वर्षाच्या एका युवकाच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आणि इतरही काही लोक पॉझिटिव्ह सापडल्यापासून पार्वतीनगर, जवाहरनगर आणि रामेश्वरी परिसर सील करण्यात आला आहे. रस्त्यांवर १० ते १५ फूट उंच टिनांनी रस्ता आडविण्यात आला आहे.

There's just silence everywhere ----- | तेथे सर्वत्र फक्त शांतताच -----

तेथे सर्वत्र फक्त शांतताच -----

ठळक मुद्देलोकमत ग्राऊंड रिपोर्टपार्वतीनगर, जवाहरनगर, रामेश्वरीतील ‘आँखो देखा हाल’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : या रस्त्यांवरून लोक कधीही सर्रासपणे ये-जा करायचे. कधीही अडचण आली नाही. परंतु २२ वर्षाच्या एका युवकाच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आणि इतरही काही लोक पॉझिटिव्ह सापडल्यापासून पार्वतीनगर, जवाहरनगर आणि रामेश्वरी परिसर सील करण्यात आला आहे. रस्त्यांवर १० ते १५ फूट उंच टिनांनी रस्ता आडविण्यात आला आहे. एक अरुंद एंट्री गेट ठेवण्यात आले आहे. कचरागाडी, भाजी विकणारा आणि, दूध विकणारेही सील करण्यात आलेल्या परिसरात येऊ शकत नाहीत. भीती इतकी आहे की लोकही आपल्या घराबाहेर पडण्यास भीत आहेत. बहुतांश घरांच्या गेटवर तर लोकांनी भीतीमुळे कुलूप लावले आहे. कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांवर कधी लोक सहजपणे फेरफटका मारताना दिसायचे ते रस्ते आता शांत आहेत. परिसरात इतकी स्मशान शांतता आहे की, आपल्या घरांमध्ये असलेले लोकही स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या घरातील गर्भवती महिला आणि वयोवृद्ध लोकांना उपचारासाठी नियमित रुग्णालयात जाणेही कठीण झाले आहे. कुणाला जायचेच असेल तर इतक्या तांत्रिक अडचणी येतात की व्यक्ती त्रस्त होतो. एकूणच आम्हाला तुरुंगातील कैद्यांसारखे वाटतेय, अशी इथल्या लोकांची प्रतिक्रिया आहे.

आणखी किती दिवस?
या परिसरातील नागरिक मागील काही दिवसांपासून घरगुती सिलिंडरची आतुरतेने वाट पाहत होते. सिलिंडरच्या गाडीला मोठ्या प्रयत्नानंतर बुधवारी प्रवेश मिळाला. परिसरात इतकी स्मशान शांतता आहे की, बाल्कनीतून लोकांना केवळ सील करण्यासाठी लावलेले टिन दिसून येतात. पुढील १४ दिवस दुसरा रुग्ण आढळून न आल्यास हा परिसर मोकळा करण्यात येईल. परंतु दुसरा रुग्ण आढळलाच तर मात्र आणखी १४ दिवस वाट पाहावी लागेल, याचा विचारानेही लोक अतिशय चिंतेत पडले आहेत.

Web Title: There's just silence everywhere -----

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.