शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाईन’साठी शिक्षण मंत्रालयात राहणार विशेष विभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 05:07 IST

‘डिजिटल डिव्हाईड’ दूर करण्यावर भर : ‘व्हर्च्युअल लॅब’ विकसित करणार

योगेश पांडे।नागपूर : ‘कोरोना’मुळे देशभरात ‘आॅनलाईन’ शिक्षणावर भर दिला जात असून या प्रणालीचे भविष्यातील महत्त्व सर्वांनाच लक्षात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणातदेखील ‘डिजिटल’ माध्यमावर विशेष भर देण्यात आला आहे. शिक्षणमंत्रालयात ‘आॅनलाईन’ शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी विशेष समर्पित विभागच राहणार आहे. ‘डिजिटल’ शिक्षणासाठी पायाभूत सुविधा, साहित्य निर्मिती तसेच विविध बदलांनुसार शिक्षण तंत्रात बदल यासंदर्भात या माध्यमातून पावले उचलण्यात येतील.

तंत्रज्ञान सातत्याने बदलताना दिसून येत असून दर सहा महिन्यांत नवीन उपकरणे व तंत्र समोर येत आहे. अशा स्थितीत या विशेष विभागामार्फत त्यानुसार ‘आॅनलाईन’ शिक्षण प्रणालीतदेखील आवश्यक बदल करण्यात येईल. शालेय शिक्षण व उच्च शिक्षणातील विद्यार्थी व शिक्षकांची गरज लक्षात घेऊन ‘डिजिटल कंटेंट’ विकसित करण्यात येईल. या विभागात शिक्षणतज्ज्ञच नाही तर प्रशासकीय, तंत्रज्ञान, ‘ई-गव्हर्नन्स’ आदी क्षेत्रांतील लोकांचाही समावेश राहणार आहे. शिवाय देशपातळीवर ‘व्हर्च्युअल लॅब्स’ विकसित करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येईल.यावर मंत्रालयाचा भरच्‘पायलट स्टडी’ राबविणारच्‘डिजिटल’ पायाभूत सुविधांवर भरच् शिक्षणासाठी नवीन ‘प्लॅटफॉर्म’ विकसित करणारच्‘व्हर्च्युअल लॅब्स’ विकसित करणारच्शिक्षकांच्या निरंतर प्रशिक्षणासाठी सुविधाच्परीक्षा व मूल्यमापनाचा आराखडा ठरविणारच्पारंपारिक व ‘डिजिटल’ शिक्षणप्रणालीची सांगड घालणारे‘मॉडेल’ तयार करणारच्शिक्षणासाठी मापदंड निश्चित करणार.जनसंवाद माध्यमांतून२४ बाय ७ धडेदेशात लोकसंख्येचा मोठा टक्का आजदेखील ‘आॅनलाईन’ माध्यमांपासून दूर आहे. हे अंतर दूर करण्यासाठी व सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना हे शिक्षण सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी या धोरणानुसार विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. याअंतर्गत दुरचित्रवाणी, रेडिओ, ‘कम्युनिटी रेडिओ’ या जनसंवाद माध्यमांतून वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना धडे देण्यात येतील. विविध भाषांमध्ये शिक्षण देण्याची सुविधा असणार आहे.‘अ‍ॅप’, ‘गेम्स’देखील विकसित करणारहसतखेळत व प्रात्यक्षिक आधारित ‘आॅनलाईन’ शिक्षण व्हावे यासाठी देशपातळीवर ‘डिजिटल’ संग्रह तयार करण्यात येणार आहे. यात ‘कोर्सवर्क’ची निर्मिती, ‘लर्निंग गेम्स’, ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ इत्यादींचा समावेश असेल. याशिवाय विद्यार्थ्यांना विविध विषय तसेच भारतीय कला-संस्कृती सहजतेने कळावी यासाठी ‘गेम’आधारित ‘अ‍ॅप’देखील विकसित करण्यात येतील.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रnagpurनागपूरMantralayaमंत्रालय