"बाई, बुब्स आणि ब्रा'वरील चर्चेची चळवळ व्हावी, 'सायबर बुलिंग'विरोधात कठोर कायदे करावेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 04:03 PM2021-07-15T16:03:21+5:302021-07-15T16:19:34+5:30

Strict laws should be enacted against cyber bullying - सायबर तज्ज्ञ अजित पारसेंचं गृहमंत्र्यांना पत्र

"There should be a movement for discussion on women, boobs and bras. Strict laws should be enacted against cyber bullying." | "बाई, बुब्स आणि ब्रा'वरील चर्चेची चळवळ व्हावी, 'सायबर बुलिंग'विरोधात कठोर कायदे करावेत"

"बाई, बुब्स आणि ब्रा'वरील चर्चेची चळवळ व्हावी, 'सायबर बुलिंग'विरोधात कठोर कायदे करावेत"

googlenewsNext
ठळक मुद्देसायबर आणि सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी पत्रात अशी खंत व्यक्त केली आहे की, अभिनेत्री हेमांगी कमी यांनी चपात्या करतानाचं रिल इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर अपलोड केला आणि त्यावर अनेक नकारात्मक कमेंट्स आल्या, या कमेंट्स सायबरुबुलिंगच्या प्रकाराचत मोडता

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हिच्या सोशल मीडियावर ब्रा या विषयावरची चर्चा खूप गाजते आहे. हेगांमी कवी यांनी बिनधास्तपणे 'बाई, बुब्स आणि ब्रा'बाबत आपली मतं सोशल मीडियावर मांडली, पण या निमित्तानं पुन्हा एकदा 'सायबरबुलिंग' म्हणजेच, सोशल मीडियावरील छेडखानीसारख्या गंभीर विषयाची चर्चा सुरु झाली. सायबरबुलिंग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणारे कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे मत सायबर आणि सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केली आहे. याबाबतची मागणी करणारं एक पत्र त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लिहीलं आहे.

अभिनेत्री हेमांगी कमी यांनी चपात्या करतानाचं रिल इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर अपलोड केला आणि त्यावर अनेक नकारात्मक कमेंट्स आल्या. नंतर हेमांगी कवीने फेसबुक = पोस्टमध्ये लिहिले की, बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉइस असू शकतो!मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही! हाँ त्यावरून परिक्षण करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि गॉसिप करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा चॉइस! 

  

सायबर आणि सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी पत्रात अशी खंत व्यक्त केली आहे की, अभिनेत्री हेमांगी कमी यांनी चपात्या करतानाचं रिल इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर अपलोड केला आणि त्यावर अनेक नकारात्मक कमेंट्स आल्या, या कमेंट्स सायबरुबुलिंगच्या प्रकाराचत मोडतात. "हेमांगीसारख्या असंख्य मुली आणि महिलांना रोज सोशल माध्यमावर सायबरबुलिंग म्हणजेच ऑनलाईन छेडखानीचा सामना करावा लागतो आहे. आजच्या अत्याधुनिक इंटरनेटच्या जगात ऑनलाईन होणारी छेडखानी मुली किंवा महिलांच्या मानसिक आरोग्यावर आघात करु शकते, किंवा सामाजिक जीवनात त्यांना बदनाम करु शकते, हा गंभीर गुन्हा असून, याला आवर घालण्यासाठी सायबरबुलिंग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणारे कठोर कायदे करण्याची गरज सायबर आणि सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी पत्राद्वारे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे व्यक्त केली आहे.

                   

तसेच पत्रात सायबरबुलिंग, सायबरस्टाकिंग आणि सायबर हरॅशमेंट हे सर्व एकच प्रकार आहे, सोशल माध्यमावर अश्लिल कमेंट्स किंवा चॅटिंग करणे, कुणाची फेक आयडी तयार करुण बदनामी करणे, नको त्या बाबी टॅग करणे, ब्लॅकमेलिंग करणे. मुली किंवा महिलांसोबत घडणारे असे सर्व प्रकार ऑनलाईन छेडखानीत मोडतात. तसेच सोशल माध्यमात वावरताना याचा सर्वाधिक सामना महिला आणि मुलींना करावा लागतो. देशात सोशल मिडिया वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. यंदा तो आकडा ४४ कोटींच्या वर गेला आहेत, देशातइंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढून ६२४ मिलीयनपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच सध्या देशात एकूण लोकसंख्येच्या ४० टक्क्यांच्या आसपास लोक इंटरनेटचा वापर करतात. इंटरनेट आणि सोशल मिडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. त्यामुळे इंटरनेटच्या जगात वावरताना, देश विदेशात कुठेही बसून महिलांची ऑनलाईन छेडखानी करु शकतो असे देखील नमूद केले आहे. 

 

सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या छेडखानीतून महिलांना संरक्षण देण्यासाठी कठोर कायदे आपल्याकडे आहेत. पण ऑनलाईन छेडखाणी रोखण्यासाठी इतके प्रभावी कायदे नाहीत, त्यामुळे एखाद्या मुलीसोबत सायबरबुलिंगचा प्रकार घडला , तर त्या गुन्हेगाराला कुठुनंही खेचून आणता येईल आणि पोलीस कोठडीपर्यंत पोहोचवता येतील, अशा कठोर कायद्याची आज खरंच गरज आहे. तेव्हाच हेमांगी कवी सोबत घडलेला प्रकार इतर मुलींसोबत घडणार नाही. इंटरनेटचं जग आणि सोशल माध्यमाचा वाढता वापर, यामुळे आपलं समाजजीवन ढवळून निघालं आहे. सोशल माध्यमामूळे संपूर्ण जग एक ग्लोबल व्हिलेज झालं आहे. या माध्यमाच्या अनेक सकारात्मक बाजू आहेत. पण त्याच्या नकारात्मक बाजूंकडे दुर्लक्ष केल्यास, त्याची मोठी किंमत आपल्या आई- बहिणींना मोजावी लागू शकते. त्यामुळेच 'बाई, बुब्स आणि ब्रा'पासून सुरु झालेली चर्चा एक चळवळ बनावी, आणि यातून धडा घेत आपल्या शासनकर्त्यांनी कठोर कायदे करावे आणि दुसरीकडे सोशल माध्यमं वापरणाऱ्या मुली आणि महिलांनी आपल्यासोबत ऑनलाईन
छेडखानी घडल्यास, त्याची त्वरीत पोलीस तक्रार करावी. जेणेकरुन अशा सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या वेळीच आवळणं शक्य होईल. आणि ऑनलाईन छेडखानीला आळा बसेल असे अजित यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

Web Title: "There should be a movement for discussion on women, boobs and bras. Strict laws should be enacted against cyber bullying."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.