शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

मंजुरीनंतरही राज्यातील अभयारण्यासाठी झोनल मास्टर प्लॅन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:33 IST

राज्यात २०१६ पासून तर २०१९ या काळात २० इको सेन्सेटिव्ह झोन (इएसझेड) राज्य सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केले आहेत. यामुळे या सर्व वन क्षेत्रांना सुरक्षा कवच प्राप्त होण्याची अपेक्षा होती. यातील तरतुदीनुसार संबंधित सर्व अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पांसाठी दोन वर्षांच्या आत झोनल मास्टर प्लॅन तयार होणे अपेक्षित होते. नियमातच तशी तरतूद होती. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामत: राज्यातील अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पासमोर असलेल्या अडचणी आणि धोके कायमच आहेत.

ठळक मुद्दे२०१६ पासून २० प्रकल्प प्रतीक्षेत : अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्पांपुढे अडचणी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात २०१६ पासून तर २०१९ या काळात २० इको सेन्सेटिव्ह झोन (इएसझेड) राज्य सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केले आहेत. यामुळे या सर्व वन क्षेत्रांना सुरक्षा कवच प्राप्त होण्याची अपेक्षा होती. यातील तरतुदीनुसार संबंधित सर्व अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पांसाठी दोन वर्षांच्या आत झोनल मास्टर प्लॅन तयार होणे अपेक्षित होते. नियमातच तशी तरतूद होती. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामत: राज्यातील अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पासमोर असलेल्या अडचणी आणि धोके कायमच आहेत.वनसंवर्धनासोबतन त्यातील प्राण्यांना संरक्षण मिळावे, पर्यावरणाच्या दृष्टीनेही कायद्याचे सुरक्षा कवच मिळावे यासाठी राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने ही तरतूद केली आहे. त्या दृष्टीने कामही सुरू झाले होते. मात्र यातील अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नाही. परिणामत: प्रकल्पांचे काम म्हणावे तसे पुढे सरकले नाही. यातील तरतुदीनुसार, महाराष्ट्रातील अभयारण्ये व व्याघ्र प्रकल्पासभोवताल इको सेन्सेटिव्ह झोन घोषित करणे आवश्यक आहे. आतापर्यंत पर्यावरण मंत्रालयाकडून २० इएसझेड घोषित झाले आहेत. यातील तरतुदीनुसार संबंधित अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाचे झोनल मास्टर प्लॅन तयार करून राज्य सरकारने त्यास मंजुरी प्रदान करणे आवश्यक होते. इएसझेडची अंतिम अधिसूनचा निघाल्यावर दोन वर्षाच्या आत हा झोनल मास्टर प्लॅन तयार करणे आवश्यक होते. मात्र २०१६ मध्ये अधिसूचना निघूनही याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. संबंधित प्रकल्पांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मॉनिटरिंग कमिटी तयार करण्याची तरतूद आहे. मात्र अनेक ठिकाणी अशा कमिट्या तयार नसल्याची बाब पुढे आली आहे.इएसझेड अंतर्गत पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात शासनाच्या विविध विभागाकडून करण्यात येणारी कामे, विकासकामांना प्रतिबंध असेल तर या संदर्भात सर्व विभागांशी चर्चा करून झोनल मास्टर प्लॅन तयार करण्याची आणि त्यावर सर्वसंमतीने तोडगा काढण्याची तरतूद कमिटीच्या अधिकारात आहेत. स्थानिकांच्या उपजीविकेशी संबंधित बाबींचा विचार करण्याचे अधिकारही या कमिटीला आहे. मात्र या दृष्टीने काम पुढे सरकले नाही. यामुळे राज्य सरकारने यात पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाली चर्चादोन दिवसापूर्वी मुख्यंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव समितीच्या बैठकीत समितीचे चंद्रपुरातील सदस्य बंडू धोत्रे यांनी या विषयाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे हा विषय आता वन आणि पर्यावरण विभागात चर्चेला झाला आहे. धोत्रे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना अलिकडेच पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणून दिली होती, हे विशेष !इएसझेड घोषित झालेली अभयारण्ये व व्याघ्र प्रकल्पकरानला वाईल्डलाईफ सेंच्युरी (रायगड), नागझिरा वाईल्डलाईफ सेंच्युरी (गोंदिया), पैनगंगा वाईल्डलाईफ सेंच्युरी (यवतमाळ), संजय गांधी नॅशनल पार्क (मुंबइ), गौताळा उत्तरामघाट वाईल्डलाईफ सेंच्युरी (औरंगाबादा), मेळघाट व्याघ्र प्रकल्प (अमरावती), लोणार वाईल्डलाईफ सेंच्युरी (बुलढाणा), उमरेड कºहांडला वाईल्डलाईफ सेंच्युरी (नागपूर), भामरागड वाईल्डलाईफ सेंच्युरी (गडचिरोली), कळसुबाइ हरिश्चंद्रगड वाईल्डलाईफ सेंच्युरी (अहमदनगर), संगमेश्वर वाईल्डलाईफ सेंच्युरी (सांगली), फणसाद वाईल्डलाईफ सेंच्युरी (रायगड), ज्ञानगंगा वाईल्डलाईफ सेंच्युरी (बुलडाणा), गंगेवाडी न्यू ग्रेट इंडियन बुस्टर्ड सेंच्युरी (सोलापूर), येडसी रामलिंग घाट वाईल्डलाईफ सेंच्युरी (उस्मानाबाद), जायकवाडी बर्ड सेंच्युरी (अहमदनगर), मानसिंगदेव वाईल्डलाईफ सेंच्युरी (नागपूर), टिपेश्वर वाईल्डलाईफ सेंच्युरी (यवतमाळ), अनेरडम वाईल्डलाईफ सेंच्युरी (धुळे), ताडोबा टायगर रिझर्व्ह आणि अंधारी वाईल्डलाईफ सेच्युरी (चंद्रपूर)

टॅग्स :forestजंगलMaharashtraमहाराष्ट्र