"आघाडी सरकारला कसलाही धोका नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:43 IST2020-08-17T02:56:53+5:302020-08-17T06:43:11+5:30
राज्य सरकारला कोणताही धोका नाही पाच वर्षे सरकार चालेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

"आघाडी सरकारला कसलाही धोका नाही"
नागपूर : सरकार पडणार असे म्हणणारे अज्ञानी ज्योतिषी आहेत, ज्यांना कोरोना येणार हे माहीत नव्हते, अशा लोकांनी सरकारची कुंडली मांडू नये. या सरकारला कोणताही धोका नाही. महाराष्ट्रात आॅपरेशन लोटस होणार नाही. उलट रिव्हर्स आॅपरेशन होऊ शकते, असे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी येथे स्पष्ट केले. राज्य सरकारला कोणताही धोका नाही पाच वर्षे सरकार चालेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
रविवारी प्रेस क्लबमध्ये जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला. या कार्यक्रमानंतर प्रफुल्ल पटेल यांना पार्थ पवारबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, हा कोणता मोठा विषय नाही, शरद पवार आमचे आदरणीय नेते आहेत. ते सांगतील ते आम्ही करू. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा काही विषयच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.