शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नोटीसला सावकार मोजतच नाही

By admin | Updated: April 6, 2016 03:23 IST

राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे संतप्त झालेल्या सावकारांकडून चक्क अधिकाऱ्यांच्या नोटीस केराच्या टोपलीत फेकण्यात येत असल्याचा आरोप कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा आरोप : कर्जमाफी योजनेपासून वाचण्यासाठी विविध क्लृप्त्यानागपूर : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे संतप्त झालेल्या सावकारांकडून चक्क अधिकाऱ्यांच्या नोटीस केराच्या टोपलीत फेकण्यात येत असल्याचा आरोप कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणीसाठी आलेल्या पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली फिर्याद मांडली. नियमानुसार पैसे घेऊन शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेले सोने परत करण्यासदेखील सावकार चालढकल करीत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी सावकारांद्वारे होणाऱ्या अत्याचारांबाबत ज्या गोष्टी सांगितल्या, त्यावरून तरी शेतकरी कर्जमुक्त होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोमवारी पारशिवनी, करंभाड, गोसेवाडी, कोंडासावळी, पालासावळी, सुवरधरा, बाबुळखेडा, बिठोली, सालई, टेंभरी, आवळेघाट, खंडाळा, डुमरी इत्यादी गावांतील सावकारांपासून त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा सहायक उपनिबंधक भोसले यांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतील तरतुदींपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सावकार विविध क्लृप्त्या वापरत आहेत. सावकार केवळ शेतकऱ्यांनाच लुबाडत नसून शासनालादेखील वाकुल्या दाखवत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१४ मधील हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची सावकारी कर्जातून मुक्तता करण्याची घोषणा केली होती. १० एप्रिल २०१५ रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंतच्या सावकरी कर्ज व व्याजाला शासनाने माफ केले होते. या निर्णयांतर्गत परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाला माफी देण्यात आली होती.(प्रतिनिधी)