पदवीधरमध्ये बहुरंगी लढत
By Admin | Updated: June 7, 2014 02:21 IST2014-06-07T02:21:58+5:302014-06-07T02:21:58+5:30
विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत

पदवीधरमध्ये बहुरंगी लढत
दोघांची माघार : १४ रिंगणात
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नरेंद्र मोहिते आणि मिलिंद मानापुरे या दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. १४ उमेदवार रिंगणात असल्याने बहुरंगी लढत होणार आहे.
२0 जून रोजी होणार्या निवडणुकीसाठी एकूण २0 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मोहिते आणि मानापुरे यांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्याने रिंगणात १४ उमेदवार शिल्लक आहेत. त्यात प्रामुख्याने काँग्रसे आघाडीचे डॉ. बबनराव तायवाडे, भाजपचे प्रा. अनिल सोले, अपक्ष किशोर गजभिये आणि महेंद्र निंबार्ते यांचा समावेश आहे. सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच पदवीधरांच्या निवडणुकीतही उमेदवारांची गर्दी झाली आहे. निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करायचे आहे. निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे.
मतमोजणी प्रोव्हिडन्समध्ये
‘नोटा’चा पर्यायही उपलब्ध
पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी २४ तारखेला सिव्हिल लाईन्समधील प्रोव्हिडन्स शाळेत होणार आहे. सुरुवातीला मतमोजणीचे स्थळ निश्चित झाले नव्हते हे येथे उल्लेखनीय. दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही मतदारांना ‘नोटा’चा(नकारात्मक मतदान) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर मतदारांना मतपत्रिकेवरील ‘नोटा’चा पर्याय निवडता येईल. (प्रतिनिधी)
निंबार्तेच्या माघारीसाठी प्रयत्न
पदवीधर मतदारसंघात भाजपचे बंडखोर महेंद्र निबार्ते यांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू झाले होते. शुक्रवारी ते अर्ज मागे घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. भाजपचे काही कार्यकर्तेही विभागीय आयुक्त कार्यालयात एकत्र झाले होते. पण शेवटपर्यंत निंबार्ते आलेच नाही. माघारीची वेळ टळून गेली.
रिंगणातील उमेदवार
क्र. उमेदवार पक्ष
१ प्रा.अनिल सोले भाजप
२ डॉ. बबन तायवाडे काँग्रेस
३ पांडुरंग डबल आ.रि.पार्टी
४) किशोर गजभिये अपक्ष
५) महेंद्र निंबार्ते अपक्ष
६) अर्चना महाबुधे अपक्ष
७) अब्दुल मा.सिद्दकी अपक्ष
८) अमोल हाडके अपक्ष
९) राजेंद्र कराळे अपक्ष
१0) गोकूल पांडे अपक्ष
११) चंद्रकांत गेडाम अपक्ष
१२) महादेव पाटील अपक्ष
१३) राजेंद्र लांजेवार अपक्ष
१४) तीर्थराज हरिणखेडे अपक्ष