शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

देखभाल दुरुस्तीच्या नावावर लाखोंचा खर्च पण रेकॉर्डच नाही

By गणेश हुड | Updated: May 22, 2024 18:51 IST

अंगणवाडी साहित्य घोटाळा : आठ लाखांचा हिशेबच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या अंगणवाडी श्रेणीवर्धन योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाड्यांना साहित्य खरेदीसाठी ९८ लाख तर देखभाल दुरुस्तीसाठी ८ लाख १३ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला शासनाकडून प्राप्त झाला. साहित्य खरेदीत अनियमितता झाली. दुसरीकडे अंगणवाडी केंद्र दुरुस्तीच्या नावावर खर्च करण्यात आलेल्या ८ लाख १३ हजार रुपयांचा हिशेबच नाही. हा निधी नेमका कोणत्या कामावर खर्च करण्यात आला याचे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे.

 

अंगणवाड्यांना साहित्य पुरवठा करण्यापूर्वीच कंत्राटदाराला ९६ लाख रुपयांचे बिल देण्यात आले. तसेच दुरुस्तीसाठी ८ लाख १३ हजारांचा खर्च करण्यात आला. साहित्य पुरवठ्यासाठी कोणत्या निकषाच्या आधारावर अंगणवाड्यांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या ४९ अंगणवाड्यांना साहित्य पुरवठा झाला की नाही. याची शहानिशा न करताच कंत्राटदाराला बिल देण्यात आले. दुसरीकडे २७१ अंगणवाड्यांना दुरुस्तीसाठी ८.१३ लाखांचा निधी दिला. हा निधी कुठल्या निकषाच्या आधारावर देण्यात आला, असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.

 

साहित्याचा पुरवठा न करताच कंत्राटदाराने बिल उचलल्याचे उघडकीस आल्यानंतर चौकशीची मागणी होताच काही अंगणवाड्यांना साहित्याचा पुरवठा करण्यात आला. तर कुठे आधीच उपलब्ध असलेल्या साहित्याचा पुरवठा केल्याचे दाखविण्यात आले. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी निधी विभागास प्राप्त झाला. हा निधी वितरित करताना सीडीपीओंनी अंगणवाड्यांना नियोजन पाठविण्याची गरज होती; परंतु नियोजन न करताच हा निधी खर्च करण्यात आल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

पडताळणी न करता कंत्राटदाराला बिलयोजनेसाठी आलेला निधी जिल्हा स्तरावरून खर्च न करता प्रकल्प स्तरावर वितरित करण्यात आला; परंतु निधी वितरण करताना तसेच खर्चाबाबत कोणत्याही सूचना सीडीपीओंना करण्यात आलेल्या नाही. जिल्हास्तरीय नियंत्रण व पर्यवेक्षकीय अधिकारी या नात्याने सदर योजनेच्या संदर्भात जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी प्रकल्प स्तरावरील मागणी योग्य आहे का याची पडताळणी करणे आवश्यक होते; परंतु पडताळणी न करताच निधी वितरित करण्यात आला तसेच बिल देण्यात आले.

 

गरज नसलेल्या साहित्याचा पुरवठानिधी जिल्हा स्तरावरून खर्च न करता प्रकल्प स्तरावर वितरित करण्यात आला. त्यामुळे जिल्हास्तरीय नियंत्रण व पर्यवेक्षकीय अधिकारी या नात्याने सदर योजनेच्या संदर्भात जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी प्रकल्प स्तरावर आवश्यक बाबीवर खर्च होतो की नाही याची पडताळणी करणे आवश्यक होते; मात्र असे काहीही घडले नाही. काही ठिकाणी गरज नसलेल्या साहित्याचा पुरवठा करण्यात आला.

 

टॅग्स :anganewadi jatraआंगणेवाडीnagpurनागपूरfraudधोकेबाजी