शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गुणपत्रिकांमध्येही घोळ; विद्यापीठाच्या ७० टक्के परीक्षांचे निकाल रखडले, सिनेटमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:52 IST

Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची शुक्रवारी झालेली अर्थसंकल्पीय सिनेट बैठक विविध परीक्षांच्या निकालावरून चांगलीच गाजली. हिवाळी सत्रातील परीक्षांच्या निकालांमध्ये होत असलेला विलंब आणि गुणपत्रिकांमधील गंभीर त्रुटी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची शुक्रवारी झालेली अर्थसंकल्पीय सिनेट बैठक विविध परीक्षांच्या निकालावरून चांगलीच गाजली. हिवाळी सत्रातील परीक्षांच्या निकालांमध्ये होत असलेला विलंब आणि गुणपत्रिकांमधील गंभीर त्रुटी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जवळपास ७० टक्के परीक्षांचे निकाल प्रलंबित असताना परीक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सॉफ्टवेअर कंपनीवर कारवाई का होत नाही, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला.

कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या सिनेट बैठकीत सदस्य अॅड. मनमोहन बाजपेयी आणि विष्णू चांगदे यांनी निकाल जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबाचा मुद्दा उपस्थित केला. हिवाळी सत्रात एकूण ११९३ परीक्षा घेण्यात आल्या होत्या; आतापर्यंत त्यातील केवळ ३५२ परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून ८४१ निकाल अद्याप प्रलंबित आहेत. सुमारे ७० टक्के निकाल रखडल्यामुळे सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. या विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश आणि शैक्षणिक नियोजनावर परिणाम होत आहे. 

अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचेही समोर आले. जाहीर झालेल्या काही गुणपत्रिकांमध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे एनरोलमेंट क्रमांकच नमूद नाहीत. तसेच लेखी परीक्षा आधी आणि प्रात्यक्षिक परीक्षा नंतर झाल्यामुळे अनेक गुणपत्रिकांमध्ये प्रात्यक्षिकाचे गुण नोंदलेले नसून त्यामुळे निकाल अपूर्ण दिसत आहेत. निकाल प्रक्रियेसाठी नियुक्त सॉफ्टवेअर एजन्सीच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करत कंपनीची चौकशी करून करार रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

सिनेट सदस्य डॉ. ओमप्रकाश चिमणकर यांनी विद्यापीठाच्या विविध विभागांच्या निकालांमध्येही चुका असल्याचे निदर्शनास आणले. त्यांनी सांगितले की, परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आयकार्ड आणि रोल नंबर देणे आवश्यक असते; मात्र अनेक विद्यार्थ्यांना आयकार्डच मिळाले नाही. त्यामुळे त्यांना आयकार्डशिवायच परीक्षा द्यावी लागली.

विद्यापीठाकडे डेटा उपलब्ध नाही

कुलगुरू यांनी सांगितले, विद्यापीठाने पूर्वीच्या 'प्रोमार्क' कंपनीकडून विद्यार्थ्यांचा आवश्यक डेटा घेतला नाही, ही मोठी चूक ठरली. नंतर नवीन कंपनीला काम देण्यात आले; परंतु वेळमर्यादा आणि वारंवार सूचना देऊनही ती वेळेत निकाल जाहीर करू शकली नाही. विद्यापीठाकडे डिव्हिजनल आणि रिव्हॅल्युएशनचा डेटा उपलब्ध नसल्यानेच निकालास विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्वतःची विद्यापीठाची यंत्रणा विकसित केली जाईल : कुलगुरू

नवीन कंपनीकडे परीक्षा प्रक्रियेचे काम दिल्यामुळे परीक्षा व निकालास सतत विलंब होतो. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. विद्यापीठ केवळ बाह्य कंपन्यांवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे विद्यापीठात स्वतंत्र 'समांतर यंत्रणा' विकसित करण्यात येईल. त्यासाठी आयटीतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांची मदतही घेतली जाईल, असे कुलगुरूंनी सांगितले. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वर्षभर लागेल, असेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur University Exam Result Delays Spark Outrage in Senate Meeting.

Web Summary : Seventy percent of Nagpur University's exam results are delayed, causing student distress. Faulty mark sheets and a lack of data compound the problem. Senators demand action against the software company responsible, pushing for an in-house solution.
टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूरEducationशिक्षणStudentविद्यार्थी