शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
4
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
5
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
6
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
7
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
8
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
9
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
10
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
11
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
12
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
13
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
14
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
15
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
16
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
17
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
18
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
19
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
20
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या

श्रीहरी अणे यांच्या पुस्तकावर संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:33 PM

राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी लिहिलेल्या ‘विदर्भ राज्य निर्मिती व महत्त्वाचे दस्तावेज’ या पुस्तकाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यासक्रमात समावेश होणार की नाही, यावर संभ्रम कायम आहे. यासंदर्भात अद्याप निर्देश जारी झाले नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी लिहिलेल्या ‘विदर्भ राज्य निर्मिती व महत्त्वाचे दस्तावेज’ या पुस्तकाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यासक्रमात समावेश होणार की नाही, यावर संभ्रम कायम आहे. यासंदर्भात अद्याप निर्देश जारी झाले नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.विद्वत परिषदेने या पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे विदर्भ कनेक्ट संस्थेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ यांच्या नेतृत्वात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेतली होती. शिष्टमंडळात संघटन सचिव दिनेश नायडू, कोषाध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू, कार्यकारी सदस्य अ‍ॅड. नीरज खांदेवाले व संदेश सिंगलकर यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने निवेदन सादर करून पुस्तकाचे महत्त्व पटवून दिले होते. तसेच, राज्यशास्त्र अभ्यासक्रमात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी व इतिहासावर एक प्रकरण आहे, याकडे लक्ष वेधले होते. हे पुस्तक संशोधनकर्ते व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त सिद्ध होईल, असेही सांगितले होते. त्यानंतर कुलगुरूंनी या पुस्तकाचा संदर्भ ग्रंथ म्हणून राज्यशास्त्र अभ्यासक्रमात समावेश करण्याचे आश्वासन दिले होते, असे बोलले जात आहे. परंतु, अधिकाऱ्यांनुसार यासंदर्भात अद्याप निर्देश जारी झाले नाहीत.

टॅग्स :Shrihri Anneश्रीहरी अणेVidarbhaविदर्भ